बीड (रिपोर्टर) जिल्हा रूग्णालयामध्ये दररोज 30 ते 35 महिला प्रसुतीसाठी दाखल होतात. सर्वसामान्यासाठी जिल्हा रूग्णालय चांगलेच आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात रूग्णालयात उपचार घेत असतात. ऑक्टोबर महिन्यात 819 महिलांची प्रसुती करण्यात आली. त्यातील 297 महिलांचे सिझर करून त्यांचे सुखरूप बाळंतपण करण्यात आले. प्रसुती वार्डामध्ये एकूण सात डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. डॉ.सुरेश साबळे यांनी रूग्णालययामध्ये अनेक चांगले बदल केल्यामुळे सर्वसामान्य रूग्णांना वेळेवर आणि चांगले उपचार मिळत आहेत.
खाजगी रूग्णालयामध्ये प्रसुती किंवा सिझर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पैसे लागतात. सरकारी रूग्णालयात प्रसुतीसाठी एक रूपयाही लागत नाही. विशेष करून प्रसुतीनंतर महिलांना त्यांच्या घरी अॅम्बुलन्सद्वारे सोडण्यात येते. जास्तीत जास्त महिलांनी जिल्हा रूग्णालयातच उपचार घ्यावेत असे आवाहन सातत्याने शासनाच्यावतीने केले जात असते. तशा सुविधा शासनाने रूग्णालयामध्ये उपलब्ध केलेल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यामध्ये 819 महिलांची जिल्हा रूग्णालयात प्रसुती झाली. यातील अडलेल्या 297 महिलांचे सिझर करून त्यांचे सुखरूप बाळंतपण करण्यात आले. प्रसुती वार्डात सात डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.