गेवराईकारांचा पो.नि.पेरगुलवार यांच्यासह पोलिसांवरील विश्वास उडाला
गेवराई (रिपोर्टर) गेल्या आठवडाभरापासून दुचाकी आणि चार चाकी गाड्या चोरीचे सत्र थांबत नसून काल शहरातून भरदिवसा पुन्हा तीन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या असून पोलीस निरीक्षक पेरगुलवार व त्यांच्या सहकारी पोलीस हे बघ्याच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. तर या निष्क्रिय कारभारामुळे गेवराईकरांचा पोलिसांवरील विश्वास उडाला असून आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनीच लक्ष घालून नागरिकांना धीर द्यावा अशी मागणी होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून गेवराई शहरासह परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून घरफोडी, गाड्या चोरी व रोड रॉबरीचे प्रमाण वाढ होत आहे. रोजच्या रोज गाड्या चोरीच्या घटना घडत असून हे चोरटे पोलिसांना आव्हान देत आहेत. दरम्यान मंगळवार दि.8 रोजी शहरातून दोन स्कुटी व एक मोटारसायकल चोरी गेल्या आहेत. यामध्ये गोदावरी मल्टिस्टेट समोरून चौधरी यांची चक -23 -झ- 0731 ही स्कुटी, दुसरी आ.पवार यांच्या घरासमोरून चक – 23 झ- 8739 या क्रमांकाची स्पेलेंडर तर तिसरी न्यु हायस्कूल शाळेच्या समोरून चक – 23 -त- 5012 या क्रमांकाची स्कुटी आशा तीन गाड्या चोरी गेल्या आहेत. परंतु निगरगठ्ठ झालेल्या गेवराई पोलिस प्रशासनाला यांचे काही देणे घेणे नसून नियमित हप्ते वसुलीवर जोर असल्याचे दिसून येत आहे. गेवराई शहरासह परिसरात रोज सुरू असलेले गाड्या चोर्यांचे सत्र सुरूच असून पोलिसांकडून मात्र एकही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिक व वाहन धारकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आसून पोलिसांवरील विश्वास उडाला असून याबाबत पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून नागरिकांना धीर द्यावा अशी मागणी होत आहे.