Friday, August 6, 2021
No menu items!
Homeबीडबाळेवाडी शिवरात जुगार अड्‌ड्यावर छापा २१ जुगार्‍यासह साडे अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त

बाळेवाडी शिवरात जुगार अड्‌ड्यावर छापा २१ जुगार्‍यासह साडे अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त


बीड (रिपोर्टर):- आंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळेवाडी शिवारात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती एसपीच्या विशेष पथकाला मिळाल्यानंतर काल दुपारी पोलीसांनी त्या ठिकाणी धाड टाकली असता २१ जुगार्‍यांना पोलीसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून नगदी १ लाख १४ हजार ६४० रूपये जुगार खेळण्याचे साहित्य, मोबाईल आणि वाहने असा एकूण ११ लाख ५३ हजार ५४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगार्‍यावर आंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर पोलीस अधिक्षक राजारामा स्वामी यांच्या विशेष पथकाने धाडसत्र मोहिम सुरू केली आहे. आंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळेवाडी शिवारात साखराबाई काकडे यांच्या राहत्या घराच्या समोर मोकळ्या जागेत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती विशेष पथक प्रमुख एपीआय विलास हजारे यांना झाल्यानंतर काल त्यांनी आपल्या टीमसह दुपारी जुगार अड्‌ड्यावर धाड टाकली असता यावेळी तेथे तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याचे २१ जुगारी यामध्ये शिवाजी विश्‍वनाथ गर्जे रा.खिळद ता.आष्टी, संजय पोपट वालेकर रा.देवीगव्हाण ता.आष्टी, यशवंत कोंडीबा खंडागळे रा.शिराळ ता.आष्टी, हनुमंत सिताराम बुद्धीवंत रा.शिराळ ता.आष्टी, नवनाथ दशरथ रोडे रा.शिराळ, ज्ञानदेव दौलत गांगर्डे रा.निमगाव गांगर्डा ता.कर्जत, बाळासाहेब अजुर्न राळेभात रा.जामखेड, राजेंद्र हिरालाल शेळके रा.निमगाव चोभा, बंडु बाबासाहेब वायबसे रा.सावरगाव, दिनकर साहेबराव नागरगोजे रा.सावरगाव सोनी, गणेश विठ्ठल दिघे रा.धानोरा, चंद्रभान आश्रुबा लोखंडे रा.धामनगाव, लहु शांताराम माने रा.नागरवाडी ता.कर्जत, सुधाकर सुभाष तारू रा.कड, विकास उत्तम मस्के रा.धानोरा, सोनु बापु औटे रा.धानोरा, राजु सायबा उमरे रा.धानोरा, सुभाष रामा फुलमाळी रा.धानोरा, केशव शिवाजी उधावंत रा.धानोरा, बाळासाहेब नारायण बंडाळे रा.दादेगाव आणि शिवाजी रामभाऊ काळे रा.निमगाव चोभा ता.आष्टी या जुगार्‍यांना पोलीसांनी ताब्यात घेवून त्यांच्या विरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!