बीड जिल्ह्यातील 1 लाख 40 हजार शेतकर्यांची केवायसी झाली नाही
बीड (रिपोर्टर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकर्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. आता हे पैसे केवायसीविना मिळणार नाहीत. सर्व शेतकर्यांना केवायसी करण्याचे निर्देशित करण्यात आले होते. 31 डिसेंबरपूर्वी ज्यांची केवायसी असणार नाही त्यांच्या खात्यावर पैसे पडणार नाहीत. बीड जिल्ह्यातील 1 लाख 40 हजार 550 शेतकर्यांची केवायसी झालेली नाही. त्यामुळे या शेतकर्यांच्या खात्यावर पैसे पडणार नाहीत.
शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यानंी 31 मार्च 2019 साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकर्यांना 2 हजार रुपये हप्त्याप्रमाणे वर्षाला 6 हजार रुपये मिळतात. यात काही बोगस शेतकरी असल्याचे समोर आल्यानंतर शासनाने केवायसी करण्याचे बंधनकारक केले. डिसेंबर महिन्यात जो हप्ता पडणार आहे तो हप्ता केवायसीविना पडणार नाही. बीड जिल्ह्यातील 1 लाख 40 हजार 550 शेतकर्यांची केवायसी झाली नसून या सर्व शेतकर्यांच्या खात्यावर पुढील हप्ता पडणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. यातील काही शेतकर्यांनी केवायसी केली तरच त्यांना पैसे मिळणार आहेत.