Friday, August 6, 2021
No menu items!
Homeकोरोनाउद्या पालकमंत्र्यांच्या मॅराथॉन बैठका लॉकडून बाबत निर्णय होणार?

उद्या पालकमंत्र्यांच्या मॅराथॉन बैठका लॉकडून बाबत निर्णय होणार?

बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन लावले आहे तर काही ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहते. उद्या पालकमंत्री धनंजय मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळ्या विषयांवर सकाळपासून मॅराथॉन बैठका घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी आपले प्रतिनिधी म्हणून उपायुक्त सुरेश बेदमुथ्था यांना प्रशासनाचा आढावा घेण्यासाठी आज बीड येथे पाठवलेले आहे. ते सकाळपासून जिल्हा परिषदेच्या विविध अधिकार्‍यांसोबत आढावा घेत आहेत.
पालकमंत्री धनंजय मुंडे हे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत असून यामध्ये जिल्ह्यातील विविध पाटबंधारे, प्रकल्पाचे रखडलेले कामे, जलजीवन मिशन या अंतर्गत पाठवलेले प्रस्ताव, निघालेल्या त्रुटी, आणि परळी बायपासच्या कामासंदर्भात आढावा घेत असून या तिन्ही विषयांच्या बैठकासोबत बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात शनिवार, रविवार लॉकडाऊन लावायचा की कडक निर्बंध लावायचा की काही दिवसांचा कडक लॉकडाऊन लावायचा याबाबतचा निर्णय या बैठकीत होईल. या पार्श्‍वभूमीवर विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी आपले प्रतिनिधी म्हणून याबाबतचा विशेष आढावा घेण्यासाठी उपायुक्त सुरेश बेदमुथ्था यांना पाठविले असून तेही कोरोनाचा आढावा घेऊन केंद्रेकरांना आपला अहवाल सुपूर्द करणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!