माजलगाव (रिपोर्टर) माजलगाव ते मंजरथ रस्त्यासाठी अनेक दिवसापासून प्रशासनाला निवेदन देऊन सुधा रस्ता होत नाही, मंदिरात हे गाव विविध धार्मिक स्थळांनी नटलेले असून या ठिकाणी दशक्रिया विधीसह अनेक धार्मिक विधी साठी राज्यातील कानाकोपर्यातून लोक मंदिरात येथे येतात परंतु माजलगाव मंदिरात रस्त्याची झालेली दुरावस्था यामुळे या येणार्या लोकांना रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो या प्रश्नावर पँथर सेनेच्या वतीने मोबाईल टॉवरवर चढत शोले स्टाईल आंदोलन सुरु केले आहे.
तालुक्या पासुन काही अंतरावर असलेले मंजरथ हे ऐतिहासीक धार्मिक स्थळ असुन धार्मिक विधी साठी प्रसिध्द आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या काना कोपर्यातून लोक येत असतात पण येथील मुख्य रस्त्यामुळे नागरिक वैतागले आहेत.
कारण रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता काही कळेना नागरीकांना आपला जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत असुन बस सेवाही बंद झालेली आहे. पण याकडे माञ जि.प बांधकाम उपविभागाचे दुर्लक्ष असल्याने आजदि 14 रोजी सकाळी 10 गावकरी थेट आयडिया टॉवरवर प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे की,माजलगांव तालुक्यापासुन जवळपास 11 किलोमीटर वर गोदावरी नदीतीरावर वसलेले मंजरथ हे चार पाच हजार लोक संख्या असलेले गाव आहे. ऐतिहासिक वास्तु व धार्मिक विधी साठी गावाला तीर्थ क्षेञाचा दर्जा प्राप्त आहे. दक्षिण प्रयाग लक्ष्मी ञिविक्रम मंदिर गोदातीरावरील घाटासह लहान मोठी जवळपास 40 मंदिरे येथे आहेत गोदावरी सिंदफना व गुप्त सरस्वती या नदीचा येथे ञिवेणी संगम आहे त्यामुळे दशक्रिय विधिसह इतर धार्मिक विधीसाठी राज्यभरातुन दररोज शेकडो नागरिक येथे येतात . परंतु प्रशासनाच्या उदासिनतेमुळे मंजरथ ते माजलगाव रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारकांना व शालेय विध्यार्थ्यांना व शेतकर्यांना याचा ञास सहन करावा लागत आहे या रस्त्याचे काम तात्काळ दुरूस्त करण्याची मागणी खूप दिवसापासून नागरिक विविध माध्यमातून करत आहेत. मात्र या प्रश्नची समधीत कार्यालय व लोक प्रतिनिधी दखल घेत नाहीत या मुळे काल गावातील नागतिकांनी बांधकाम विभाग ,तहसील व लोक प्रतिनिधी च्या विरोधात घोषणा बाजी करत सुमारे आयडिया टॉवरवर शोले स्टाईल दोन तास आंदोलन केले.
या आंदोलनात पँथर सेनेचे युवक जिल्हाध्यक्ष भिमराव कदम , एस एफ आय माजलगांव तालुका उपाध्यक्ष सोपान ठाकरे, ज्ञानेश्वर वाघमारे, अरुण खुणे ,बालचंद चुंबळे,अनिल पराड आदी गावकरी उपस्थित होते.