** ऊसाच्या क्षेत्राने शेतकरी राजा सुखावला
** आज देखील प्रकल्प ओव्हर फुल
** खाजगी लोकांच्या हातात सुरक्षा
** वरिष्ठ आधिकाऱ्याचे मात्र दुर्लक्ष
** अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण ?
वडवणी (रिपोर्टर) वडवणी तालुक्यात मौजे सोन्नाखोटा येथे एकमेव उर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प आहे.या प्रकल्पामुळे जिथं एकेकाळी साधे बाजरीचे पिक देखील घ्यायचे म्हटले व्यवस्थित येत नव्हते परंतु आज घडीला हजारो एकरवर ऊसाची लागवड करुन शेतकरी आर्थिक घटकात सुखावला आहे.परंतु याच प्रकल्पाची सुरक्षा रामभरोसे असल्याची दिसून येत आहे.तर खाजगी लोकाच यांची पहारेकरी असल्याचे पाहवयास मिळत असल्याने अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित राहत आहे.
वडवणी शहरासह तालुक्याला नंदवन करणारा मौजे सोन्नाखोटा येथील ऊर्ध्व कुंडलिका मध्यम प्रकल्प म्हणुन ओळखला जातो.या प्रकल्प व्हावा म्हणुन आ.प्रकाश सोंळके सह तात्कालीन चौसाळा मतदार संघाचे माजी आ.केशवराव आंधळे यांचे मोठे योगदान राहिले असल्याने मागील काही वर्षापासून प्रकल्प शेतीसाठी वरदान ठरत आहे.वडवणी तालुक्यातील 10 ते 20 खेड्याच नंदवन करणारा प्रकल्प म्हणून देखील यांची गणना केली जात आहे.कधी काळी बाजरी पिक देखील व्यवस्थित येत नसल्याने शेतीकडे बळीराजाने दुर्लक्ष केले आहे.परंतु प्रकल्पाची उभारणी झाल्यापासून त्याच ठिकाणी आता हजारो हेक्टरवर ऊसाचे पिक उभा आहे.यातून शेतकरी राजाचे देखील आर्थिक नंदवन होत असाल्याचे चित्र दिसून येत असल्याने यांचा फायदा ग्रामीण भागातील शेतीला देखील बंद नलिकेद्वारे पाणी दिले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.परंतु येथील सुरक्षा मात्र रामभरोसे आसल्याची दिसून येत आहे.काल याठिकाणी दै.रिपोर्टरचे प्रतिनिधी यांनी भेट दिली तेव्हा एक खाजगी मुलगाच सुरक्षा आणि इतर कामकाज पाहत असल्याचे दिसून आला आहे.आँफीसच्या जवळ दारुच्या बाटल्या देखील दिसून आल्या आहेत.तर काही लोकांनी व्हिजीट सेल्फी पाईंट देखील बनवला असल्याचे निदर्शनास आले असल्याने याकडे वरिष्ठ आधिकारी या प्रकल्पाची सुरक्षा उंटावरुव शेळ्या हाकतात का? अशी परस्थिती दिसून येत असून अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण ? असा देखील प्रश्न उपस्थित राहत आहे.
सुरक्षा नावाचा बट्याबोळ कि दुर्लक्ष
सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करुन सदरील प्रकल्प उभा केला आहे.शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी सह गांव यामध्ये गेले आहे.कर्मचारी देखील नेमणूक असल्याचे बोलल जात आसताना काल अचानक दै.रिपोर्टरच्या प्रतिनिधीनी भेट दिली तेव्हा संबधित विभागाचा कर्मचारी अथवा सुरक्षा रक्षक दिसून न येता ईतरच खाजगी लोक दिसून आले आणि तेच आँफीसचे लिखापढी आणि सुरक्षा पाहत असल्याचे दिसून आले आहेत तर त्यांना विचारले आसता आम्हीच कारभार पाहतो,आधिकारी कधी तर येतात असं सांगून मोकळे झाले असल्याने या प्रकल्पाची सुरक्षा बाबतीत बट्याबोळ कि आधिकारी दुर्लक्ष करतात यावर वरिष्ठांनी संशोधन करणे आवश्यक आहे.
आधिकाऱ्यांशी बातचित
या प्रकरणा विषयी या विभागाचे अभियंता उमेश वानखेडे यांच्याशी संपर्क साधाला आसता म्हणाले कि,मी औरंगाबाद येथील आँफीसला आहे मला याविषयी सांगता येणार नाही माहिती घेण्यासाठी उपअभियंता अजित झोल यांच्याशी संपर्क करा.यांच्याशी संपर्क साधाला आसता म्हणाले कि,याठिकाणी प्रत्येक 8 तासाला एक सुरक्षा नेमलेला आहे.असे दिवसाला 3 सुरक्षा रक्षक आहे.याची जबाबदारी हि वडवणी येथील बाबुराव सुरक्षा रक्षक या एजन्सीला दिली आहे.तेथील सुरक्षा रक्षक उपलब्ध आसतात किंवा जेवन डब्बा आणण्यासाठी गेले आसतील तेव्हा तुम्ही याठिकाणी भेट दिली का? असे विचारताच भ्रमणध्वनी बंद केला आहे.पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.