• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा; राजीनाम्याची घोषणा, खोटा गुन्हा असल्याचा आव्हाडांचा दावा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतली घटना

by Beed Reporter
November 14, 2022
Reading Time: 1 min read
0
आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा; राजीनाम्याची घोषणा, खोटा गुन्हा असल्याचा आव्हाडांचा दावा; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतली घटना
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मुंबई (रिपोर्टर) राष्ट्रवादी नेते तथा आ. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात एका 40 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर मुंब्रा पोलिसांनी त्यांच्या विरोधात कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. सदरचा गुन्हा हा खोटा असल्याचा दावा करत जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा ट्विटद्वारे केल्यानंतर खळबळ उडाली. या प्रकरणावरून राजकारण चांगलेच तापले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गाडीत बसलेले तर गाडीबाहेर सदरच्या महिलेस आव्हाडांनी दंडाला धरून बाजुला सारले, हा वस्तूनिष्ठ प्रकार घडल्याने मुख्यमंत्र्यांनीच विनयभंग झाला की नाही सांगावे, असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे.
काल कळवा येथील पुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यावेळी आ. जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका चाळीस वर्षीय महिलेने केला. या प्रकरणी मुंब्रा पोलिसात सदरच्या महिलेने तक्रार दिली. त्या तक्रारीत सदरची महिला म्हणते, ‘रविवारी रात्री एम.एम.आर.डी.ए. ने बांधलेल्या एका पुलाचे लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या लोकार्पण कार्यक्रमास जितेंद्र आव्हाड हे उपस्थीत होते. त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जात असताना महिला त्यांना भेटण्यासाठी जात होती. त्याचवेळी आव्हाड हे समोरून येत होते. त्यांनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने दोन्ही खांद्यांना दाबून काय उभी आहे, बाजुला हो, असे म्हणत बाजुला ढकलले. या तक्रारीवरून भा.दं.वि. आयपीसी 354 अंतर्गत आव्हाड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा हा खोटा असल्याचा दावा आव्हाडांनी करून थेट आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. या प्रकरणी आव्हाडांच्या पत्नी यांनी याला जर विनयभंग म्हणायचा तर रोज शेकडो विनयभंग दाखल होतील. पोलीस जाणीवपुर्वक खोटे गुन्हे दाखल करत आहे. हा गुन्हा कोर्टात सिद्ध होणार नाही, तेव्हा पोलिसांविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

अत्यंत नीच दर्जाचं राजकारण; आव्हाडांनी विनयभंगासारखी कृती केलेली नाही- अंजली दमानिया
महाराष्ट्रातील राजकारणात एकमेकांवर सध्या अतिश्य लाजिरवाणे आरोप होऊ लागलेत. मला राष्ट्रवादी काँग्रेस आणि जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल जराही आस्था नाही. पण मी कालचा व्हिडिओ दहावेळा पाहिला. तिथे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विनयभंगासारखी कुठलीही कृती झालेली नाही. त्यामुळे संबंधित महिलेने जितेंद्र आव्हाड यांनी अमूक ठिकाणी हात लावला, माझा विनयभंग केला, हे म्हणणे चूक आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.

शरद पवार यांना विनंती आव्हाड
याचं निलंबन करावं – बावनकुळे
तो व्हिडीओ पहा,राष्ट्रवादीत नैतिकता असेल तर राष्ट्रवादी कॉग्रेसने जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करायला हवं,अशा घटना होत राहतात अस बोलतात,आमदारकीचा राजनामा द्यायचा असेल तर द्या,अजित पवार शरद पवार राजनामा घेणार का? समर्थन कोणी आव्हड यांचे करत असेल तर त्यांना पण गुन्ह्यात घ्यायला हवं,जेवढे गुन्हे आव्हड यांच्यावर असलेल्या गुन्ह्यात सीसीटीव्ही आहे असंही भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

विनयभंग झाला हे पोलिसांनी सिद्ध करावं – ऋता आव्हाड
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा देणार असल्याचं सांगताच राजकीय वातावरण तापलं आहे. त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटलं आहे की, पोलिसांनी विनयभंग झाला आहे हे सिद्ध करावं नाहीतर त्यांच्याविरोधात कारवाई करू असंही त्या म्हणाल्या आहेत.

आव्हाडांच्या राजीनाम्याच्या निर्णयास गृहमंत्री फडणवीस जबाबदार -अजित पवार
पत्रकारपरिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले, वास्तविक त्यांनी जाहीर करून टाकलं की काही काळात माझ्यावर दोन-दोन गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला जातो आणि या सगळ्या दडपशाहीला या सगळ्या हुकूमशाहीला, पोलीस दलाचा ज्या पद्धतीने गैरवापर होतोय त्याला कंटाळून मी राजीनामा देतोय, अशा पद्धतीने त्यांनी ट्वीट केलं आहे. माझ्या पहिल्यांदा जितेंद्र आव्हाडांना विनंती आहे की अशाप्रकारे त्यांनी राजीनामा देऊ नये. तसा विचारही त्यांनी मनात आणू नये.
राजकीय जीवनात काम करत असताना ज्या राष्ट्रवादी  काँग्रेसमध्ये आपण काम करतो, शरद पवारांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वाखाली आपण काम करतो आहोत. त्यांनी तर स्वत:च्या राजकीय जीवनात अनेकप्रकारे चढउतार पाहिले आहेत, अनेकप्रकारची स्थित्यंतरं पाहिलेली आहेत. कधी आपण सरकारमध्ये तर कधी विरोधी पक्षात आपण असतो, त्यामुळे अनेक घटना घडत असतात. परंतु ज्याप्रकारे सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रात काम करत आहे, एकतरी मध्यंतरी माझ्या स्वत:च्या पाहण्यात आलं, तो चित्रपट बंद पाडण्यासाठी गेले असताना ज्यांना मारहाण झाली, तेच म्हणाले की जितेंद्र आव्हाडांनी मला त्यात वाचवलं. असं असतानाही जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्याचं काम झालं. रात्रभर एका पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं.
याचबरोबर, कायदा,सुव्यवस्था चांगली ठेवणं सरकारचं काम आहे त्यामध्ये दुमत नाही. प्रत्येक व्यक्तीने संविधानाचा आदर केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा आदर केला पाहिजे, कायद्याचा आदर केला पाहिजे. याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

Previous Post

गेवराईची घटना ताजी असताना परळी तालुक्यात पत्नीकडून पतीचा गळा आवळून खून

Next Post

उर्ध्व ’कुंडलिका’  प्रकल्प शेतीसाठी महा-वरदान, ’सुरक्षा’  मात्र रामभरोसे

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
अग्रलेख

अग्रलेख-…मग पवनराजेंचा मारेकरी कोण?

by गणेश सावंत
June 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
कटाक्ष

कटाक्ष-अभेद किल्ल्याच, झालं खंडर

by गणेश सावंत
June 18, 2026
अग्रलेख

अग्रलेख -वाचला असेल तुकातर राहू नको मुका

by गणेश सावंत
May 10, 2026
Next Post
उर्ध्व ’कुंडलिका’  प्रकल्प शेतीसाठी महा-वरदान, ’सुरक्षा’  मात्र रामभरोसे

उर्ध्व ’कुंडलिका’  प्रकल्प शेतीसाठी महा-वरदान, ’सुरक्षा’  मात्र रामभरोसे

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?