आष्टी (रिपोर्टर ):-नागपूर शहर पोलिसांनी गांजाने भरलेला ट्रक पकडलेला होता या ट्रकमध्ये 71 बॅग गांजा असून त्याचे वजन 1555 किलो रक्कम 2 कोटी 33 लाख 28 हजार असल्याने ट्रकमध्ये गांजा कुठून आला आणि कुठे जात होता? यासंदर्भात तपास सुरू असताना नागपूर पोलिसांनी गोपनीय माहिती आष्टी पोलिसांनी दिली असता संशयितांना आष्टी पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करत दोघांना बेड्या ठोकण्यात यश आले आहे.याबाबतची माहिती आष्टीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी आष्टी पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली आहे.
ओडीसा मधून निघालेला गांजा हा बीड येथे जात असल्याची माहिती नागपूर पोलिसांनी मिळाली होती.गोपनीय माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने 16 नोव्हेंबर पहाटे नागपूरच्या कापसी परिसरात ही कारवाई केली. ओडिशामधून सेंद्रिय खत घेऊन निघालेल्या ट्रकमध्ये सेंद्रिय खताच्या शेकडो पोत्यांच्या मध्ये उच्च प्रतीच्या गांजाचे जवळपास 71 पोते लपवून ठेवण्यात आले होते. पोलिसांना या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी विशेष प्रशिक्षित ’केनाईन डॉग’च्या मदतीने या ट्रकची तपासणी केली आणि त्यामध्ये सुमारे 1555 किलो गांजा सापडला आहे.नागपूर पोलिसांनी गोपनीय बीड पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांना माहिती दिली संशयितांचा आष्टी तालुक्यातील 2 जणांचा सहभाग दिसून येत आहे.त्यांची नावे ड्रायव्हर कडे चौकशी केली असता आढळून आले पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांना आदेशित केले धाराशिवकर यांनी 2 पथके तयार करून संशयितांचा शोध घेत सिनेस्टाईल पाठलाग करुन बेड्या ठोकल्या आहेत. सुभाष तुकाराम पांडुळे वय 41रा.पिंपरी घुमरी चौकशीसाठी ताब्यात घेतले अंभोरा पोलिसांनी अंबादास राघु झांजे वाहिरा वय 40 यांना कामी ताब्यात घेतले आहे.71 गोण्या झाड पत्ती सदृश्य 1555 किलो 320 ग्रॅम, 2कोटी 33 लाख 28 हजार 800 रुपयांचा गांज्या भरलेला ट्रक छत्तीसगढ येथुन अशोक लिलँड एच.पी 16 टी.-7340 नागपुर मार्गे येत होता अशी माहिती दि.17 नोव्हेंबर रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी आष्टी पोलीस ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली,हि कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर, पोलिस निरीक्षक सलिम चाऊस, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रोहित बेंबरे,पी एस आय रवि देशमाने,शिवदास केदार,सपोनि भाऊसाहेब गोसावी,पी.एस.आय प्रमोद काळे यांनी केली