Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeकोरोनाबीड पाठोपाठ अंबाजोगाई, माजलगावात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले

बीड पाठोपाठ अंबाजोगाई, माजलगावात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले

जिल्ह्यात २४८ नवे बाधीत
बीड (रिपोर्टर)- बीड शहरापाठोपाठ आता अंबाजोगाई, माजलगाव शहर आणि तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून आज दुपारी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालात कोरोनाने पुन्हा द्विशतक पार करत २४८ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. यामध्ये बीड शहरात बहुतांश रुग्ण असल्याचे दिसून येते. त्यापाठोपाठ अंबाजोगाई ५० तर माजलगावात २७ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आठवडाभरापासून बीड शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत होते. जिल्ह्यातील अन्य तालुक्यात एकअंकी अथवा दोनअंकी रुग्ण मिळून येत होते. आता मात्र बीड शहरासह अन्य तालुक्यातही रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. आज दुपारी आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार २ हजार ४८३ संशयितांची चाचणी केली असता त्यात २४८ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या बीड शहरात ११५ कोरोना बाधीत रुग्ण असून अंबाजोगार्सचा आकडा ५० वर जावून पोहचला आहे तर माजलगावात २७ कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. गेवराई १५, केज ११, धारूर ४, वडवणी ३, शिरूर ३, पाटोदा ५, परळी ६ अशी आकडेवारी समोर येत आहे. त्यामुळे बीड पाठोपाठ आता अन्य शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण समोर येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!