केज (रिपोर्टर) शहरातील अंबाजोगाई रोडवर असलेल्या एका दुकानाला रात्री आग लागली. या आगीची माहिती परिसरातील नागरिकांना झाल्यानंतर त्याठिकाणी अनेकांनी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्यात नागरिकांना यश आले. आग वेळीच विझवल्यामुळे बाजुच्या इतर दुकाना वाचल्या. ज्या दुकानाला आग लागली होती. त्या दुकानाचे जवळपास दिड लाख रूपयाचे नुकसान झाले. सकाळी नगराध्यक्ष सिता बन्सोड यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली व दुकानदारास मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
अंबाजोगाई रोडवरील दुध डेअरीसमोरील पत्र्याच्या शेडमधील केजीएन मोटार गॅरेजला रात्रीच्या दरम्यान आग लागली. आग लागल्याची माहिती त्या भागातील नागरिकांना झाल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेवून अग्नीशामक दलाला पाचारण केले. ही आग लवकर आटोक्यात आल्यामुळे बाजूच्या इतर दहा दुकाना वाचल्या. ज्या दुकानाला आग लागली होती त्या दुकानमालकाचे जवळपास दिड लाख रूपयाचे नुकसान झाले. आग शॉटसर्किटमुळे लागली असल्याचे सांगण्यात आले. सकाळी घटनास्थळी शहराच्या नगराध्यक्ष सिता बन्सोड यांनी भेट देवून पाहणी केली.
करचुंडी येथे शेतकर्याचे पाईप जळाले
नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या करचूंडी येथील मच्छिंद्र किसनराव शेटे या शेतकर्याचे शॉटसर्किटमुळे 55 हजार रूपयाचे पाईप जळाले आहेत. सदरील ही घटना विजवितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडली असल्याचे सांगण्यात आले. वेळोवेळी सांगूनही विजवितरण कंपनीने या भागातील तारा दुरूस्त केल्या नसल्याचे सांगण्यात आले आहे.