Monday, April 19, 2021
No menu items!
Home कोरोना नाईट कर्फ्यू परिणामकारक नाही; केंद्राचं महाराष्ट्राला पत्र

नाईट कर्फ्यू परिणामकारक नाही; केंद्राचं महाराष्ट्राला पत्र


बीडमध्ये नाईट लॉकडाऊन, दिवसभर ठिकठिकाणी गर्दी, व्यापार्‍यांनी चाचण्या केल्या की नाही तपासणीसाठी जिल्हाधिकार्‍यांनी नियुक्त केलं पथक, बीडसह अन्य शहरात लोकांना परिस्थितीचे गांभीर्य नाही
मुंबई (रिपोर्टर):-राज्यात करोना पुन्हा एकदा सोकावत असल्याचं दिसत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णवाढीचा वाढता आलेख कायम असून, दिवसेंदिवस तो आणखी वर सरकू लागला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं असून, विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू आणि अंशतः लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. याचसंदर्भात केंद्राने महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवलं असून, नाईट कर्फ्यू आणि नव्याने लागू केलेला लॉकडाउन परिणामकारक नसल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात करोनाचा पुन्हा उद्रेक झाल्यानंतर केंद्राने संबधित राज्यांमध्ये तज्ज्ञांची पथकं पाठवली होती. या पथकांनी राज्यातील करोना प्रसार नियंत्रित करण्याबरोबर काही उपाययोजनासंदर्भात सूचना केलेल्या आहेत. त्याचबरोबर केंद्र सरकारला अहवालही पाठलेला होता. या अहवालानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलं असून, नाईट कर्फ्यू आणि लॉकडाउनसारख्या उपाययोजना प्रसार रोखण्यात फारशा परिणामकारक नसल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय पथकांनी विदर्भाचा दौरा केला. या दौर्‍यानंतर केंद्राने विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या उपाययोजनांवर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी संक्रमित घरं शोधणे व कंटेमेंट झोनवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्याचबरोबर संक्रमण रोखण्यासाठी जर एखादी व्यक्ती करोनाबाधित आढळून आल्यास तिच्या संपर्कातील २० ते ३० जणांचा शोध घेण्याची गरज आहे, असं केंद्राने म्हटलं आहे.

पथकाकडून होणार व्यापार्‍यांची तपासणी

बीड शहरासह जिल्ह्यातील विविध भागात कोरोनाबाधीत रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने जिल्हा प्रशासनाने रात्री सात ते सकाळी सात नाईट पर्फ्यू लागू केला असला तरी दिवसभर शहरासह जिल्ह्यातल्या अन्य प्रमुख शहरांमध्ये लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. कोरोनाचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नसून जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनकडे पावले उचलल्यानंतर त्याला विरोध होत आहे. त्यामुळे नेमके करायचे काय? या अडचणीत सापडलेल्या शासन-प्रशासन व्यवस्थेकडून लॅकडाऊनबाबत चाचपणी करण्यात येत आहेे. तर जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी अँटीजेन टेस्ट न करणार्‍या व्यापार्‍यांना शोधण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे.
व्यापारी अँटीजेन टेस्ट करण्यास सहकार्य करत नसल्याने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी व्यापार्‍यांची टेस्ट व्हावी म्हणून आज एक पथक तयार केले आहे. यामध्ये महसूल विभागाचा एक कर्मचारी, जिल्हा परिषद विभागाचा एक कर्मचारी, नगर पालिकेचा एक कर्मचारी या तीन कर्मचार्‍यासोबत संबंधित पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी असे एकूण पाच कर्मचार्‍याचे पथक असणार असून ते प्रत्येक दुकानदाराकडे जावून तपासणी करणार आहेत.

Most Popular

उद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...

अग्रलेख -निर्लज्जम्

एवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी? महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...

जिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...

धनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या

बीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...