हजारो कामगारांची मेळाव्याला उपस्थिती
बीड (रिपोर्टर) राज्य सरकारकडून ग्रामपंचायत कामगारांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. शासनाने कामगारांचा विचार करून त्यांच्या वेतनात वाढ करावी, अशी मागणी कॉ. नामदेव चव्हाण यांनी बीड येथील राज्यस्तरीय मेळाव्यात केली.
बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्यस्तरीय मेळावा आयोजीत करण्यात आला असून या वेळी चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमाला कॉ. तानाजी ठोंबरे, सुभाष लांडे, मिलिंद गणवीर, सुरेश निकाळजे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित आहेत. या वेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून कामगारांच्या मागण्यांबाबत संघटना लढा लढत आहेत. राज्य सरकारने ग्रा.पं. कर्मचार्यांच्या मागण्यांकडे गांभीर्यपुर्वक पाहून त्यांच्या वेतनामध्ये वाढ करावी, अशी मागणी चव्हाण यांनी या वेळी केली. या मेळाव्याला राज्यभरातील ग्रा.पं. कर्मचार्यांनी उपस्थिती दर्शविली होती.