Sunday, April 18, 2021
No menu items!
Home क्राईम ग्राहक सेवा केंद्र मंजुर झालं म्हणत ७१ हजारांना गंडवले

ग्राहक सेवा केंद्र मंजुर झालं म्हणत ७१ हजारांना गंडवले


बीड (रिपोर्टर):- एसबीआयच्या ग्राहक सेवा केंद्रासाठी अर्ज केलेल्या अर्जदाराला तुम्हाला ग्राहक सेवा केंद्र मंजूर झाले आहे असे म्हणत अर्जदाराकडून टप्याटप्याने ७१ हजार रूपये ऑनलाईन घेवून त्याची फसवणूक केल्याचा प्रकार धारूर येथे उघडकीस आला असून या प्रकरणी धारूर पोलीसात भामट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धारूर तालुक्यातील चोरंबा येथील सुनिल चित्रसेन रिड्डे यांनी एसबीआय ग्राहक सेवा केंद्रासाठी डिसेंबर २०२० ला अर्ज केला होता. त्यानंतर २१ जानेवारी २०२१ रोजी तुम्हाला एसबीआयचे ग्राहक सेवा केंद्र मंजूर झाले आहे. त्यासाठी भामट्याने तुम्ही नोंदणीसाठी १५ हजार ६०० रूपये पेटीएम करा असे म्हणल्यानंतर अर्जदाराने ग्राहक सेवा केंद्र आपल्याला मिळणार या हेतूने भामट्याला १५ हजार ६०० रूपये पेटीएम केले. त्यानंतर दि.२१ जानेवारी ते २९ जानेवारी २०२१ दरम्यान त्या भामट्याने अर्जदाराला वेळोवेळी पैशाची मागणी केली. अर्जदाराने भामट्याच्या इंडस्ट्रीयल बँक अकाऊंट नंबर १५९५३६०२७४२२ व कॅनरा बँक अकाऊंट नं.४९५६१०१००५५६६ या अकाऊंटवर ७० हजार ९०० रूपये पाठवले. मात्र त्यानंतर अजून पैशाची मागणी होवू लागली. आपली फसवणूक झाल्याचे कळताच सुनिल रिड्डे यांनी धारूर पोलीस ठाणे गाठून आपली फसवणूक झाल्याची फिर्याद दिली. यावरून भामट्याच्या विरूद्ध कलम ४२०, ४६४ भादंवि कलम ६६ (सी) ६६ (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गायकवाड हे करत आहेत.

Most Popular

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....