व्यवस्थापनासाठी स्वयंसेवकांना सुचना;
बीड (रिपोर्टर) कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून सर्वच धार्मिक कार्यक्रमासह सामाजिक कार्यक्रम बंद होते. कोरोनाची परिस्थिती पूर्णत: निवळली आहे. त्यामुळे सर्वकाही पूर्वपदावर आले आहे. बीड शहराच्या जवळ असलेल्या नगर रोड दरम्यान दोन दिवसीय इज्तेमाचे आयोजन करण्यात आले. हा इज्तेमा 8 व 9 डिसेंबर यादरम्यान होणार आहे. जवळपास दोनशे एक्कर क्षेत्रामध्ये इज्तेमा होत आहे. इज्तेमाठिकाणी पार्किंगसह इतर सुविधा निर्माण करण्यात आले आहे. दररोज अनेक स्वयंसेवक इज्तेमाच्या कामासाठी वेळ देत आहेत.
बीड शहरापासून काही अंतरावर असलेल्या नगर रोड परिसरातील चर्हाटा फाट्याच्या पुढे दोनशे एक्करमध्ये मुस्लिम धर्मियांचा इज्तेमा होत आहे. हा इज्तेमा 8 व 9 डिसेंबर यादरम्यान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून इज्तेमाची तयारी सुरू आहे. हि तयारी अंतिम टप्यात आली. पेंडॉल उभारण्याचे काम जोमाने सुरू आहे. जिल्हाभरातील भाविक या इज्तेमाला हजेरी लावणार असून जवळपास लाखो भाविकांची उपस्थिती राहणार आहे. पाण्याच्या सुविधेसह शौचालयाची व्यवस्था करण्यात आली. इज्तेमाला जिल्हाभरातून भाविक येणार असल्याने त्या त्या तालुकाप्रमाणे पार्किंगची आणि भाविकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. इज्तेमासाठी दररोज अनेक भाविक स्वत:हून श्रमदान करत आहेत.
इज्तेमात अनेकांचे निकाह होणार
बीड येथे कोरोनानंतर भव्यदिव्य इज्तेमाचे आयोजन करण्यात आले असून या इज्तेमामध्ये जिल्हाभरातील अनेक निकाह पार पडणार आहेत. निकाहची नावनोंदणी संबंधीतांकडे करण्यात येत आहे.
स्वयंसेवकावर जबाबदारी
वाहतूकीला कसल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होवू नये. दोन दिवस वाहतूक सुरळीत रहावी यासाठी स्वयंसेवकावर ठिकठिकाणी वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.