Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडपाण्याच्या शोधात गेलेल्या बिबट्याचा विहिरीत पडुन मृत्यू ?

पाण्याच्या शोधात गेलेल्या बिबट्याचा विहिरीत पडुन मृत्यू ?


पाटोदा (रिपोर्टर)-पाणी पिण्यासाठी पाण्याच्या शोधात गेलेल्या बिबट्याचा विहीरीत पडुन मृत्यू झाला असुन वन कर्मचार्‍यांनी त्याला वर काढुन पंचनामा केला असुन हा बिबट्या पाणी पिण्याच्या शोधात विहीरीत पडला का आणखी काही कारण समजु शकले नसुन पुढील तपास वन कर्मचारी व वन अधिकारी करीत आहेत.
पाटोदा तालुक्यातील महेंद्रवाडी तहद धसपिंपळगाव येथे १९७२ साली दुष्काळात गावाला पाणी पिण्यासाठी सार्वजनिक विहीर खोदलेली असुन या विहीरीला कठडे नाहीत व वर चढण्यासाठी पायर्‍या पण नाहीत.


पाणी पिण्यासाठी पाण्याच्या शोधात या विहीरीत बिबट्या पडला व त्याला वरती न येता आल्यामुळे तो मृत झाला असावा असा अंदाज आहे.गांवातीलच दोन कर्मचार्‍यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी हा मृत बिबट्या विहीरीच्या बाहेर काढला व वरीष्ठ अधिकार्‍यांना माहिती दिली असता तेथे वन विभागाचे अधिकारी आले असुन पंचनामा करण्यात आला असुन शव विच्छेदन झच् करण्यासाठी पाटोद्याहुन डॉक्टर बळीराम राख यांना बोलावण्यात आले असुन पुढील तपास वन अधिकारी करीत आहेत.

Most Popular

error: Content is protected !!