बीड (रिपोर्टर) मोंढा भागात सातत्याने मालवाहू गाड्यांची वर्दळ पाहता या भागातील रस्ता दर्जेदार आणि टिकावू करण्यासाठी आ. संदीप क्षीरसागरांनी अधिकारी, गुत्तेदारांना सूचना देत आज प्रत्यक्ष कामास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदरचा रस्ता हा अधिक चांगला व्हावा यासाठी सिमेंट कामावर पहिल्यांदाच पेवर लेव्हलींग मशीनचा वापर करण्यात आला. सदरचा रस्ता हा चांगला होत असल्याने व्यापारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मोंढा भागातील रस्त्याचे काम रखडले होते. सदरचे काम पुर्ववत सुरू असून हे काम अधिकअधिक चांगल्या करण्याहेतू आ. संदीप क्षीरसागरांनी स्वत:हून लक्ष घातलं आहे. मोंढा भागामध्ये सातत्याने मालवाहू जडवाहने ये-जा करत असतात. त्यामुळे येथील रस्ता खचणार नाही, नादुरुस्त होणार नाही, खड्डे पडणार नाहीत याची पुर्णत: दखल घेऊन गुत्तेदाराने काम करावे, यासाठी आ. संदीप क्षीरसागरांनी आज प्रत्यक्ष कामास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. प्रथमच सिमेंट रस्ता कामासाठी पेवर लेव्हलींग मशीनचा वापर करण्यात आला आहे. सदरच्या मशीनचा वापर करण्यात यावा, अशी आग्रहाची मागणी या भागातील व्यापार्यांनी केली होती. तो आग्रह पाहता आणि रस्त्याचा दर्जा अधिक चांगला व्हावा याकरिता या मशीनचा वापर याठिकाणी करण्यात येत आहे. या वेळी आ. संदीप क्षीरसागरांनी रस्ता दर्जेदार आणि चांगला करण्याच्या सूचना अधिकारी, गुत्तेदारांना दिले आहेत.