Sunday, April 18, 2021
No menu items!
Home बीड बील उचलल्याची चर्चा का करतो म्हणून एकाचा हात मोडला

बील उचलल्याची चर्चा का करतो म्हणून एकाचा हात मोडला

बीड (रिपोर्टर):- ग्रामपंचायतच्या कामाची बील उचलल्याची चर्चा गावात का करतोस असे म्हणत दोघांनी एकाला बेदम मारहाण करत त्याचा हात मोडल्याची घटना उमरद जहॉंगीर येथे घडली असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहिदास शिवाजी भांबे (रा. उमरद जहॉंगीर) यांनी बीड ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दादासाहेब दगडू शेळके व बाबू साहेबराव आहेर (दोघे रा. उमरद जहागीर) यांनी २१ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता उमरद जहागीर रस्त्यावर अडवून तू बील उचलल्याची चर्चा गावात का करतोस? असे म्हणत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यात त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. या प्रकरणी वरील दोन्ही आरोपींविरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३२५ नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास भंदाने हे करत आहेत.

Most Popular

जिल्ह्यात आज आले 1211 पॉझिटिव्ह

बीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येते. बीड जिल्ह्यात आज...

पाच हजार रुपयांसाठी मयताच्या नातेवाईकांना आगारात बोलावले गेवराई आगारातील कर्मचार्‍यांनी व्यक्त केला संताप

गेवराई (रिपोर्टर) : येथील आगारातील चालक संतोष गायकवाड यांचा कोरोना आजाराने बुधवार ता. १४ रोजी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला....

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे जिल्ह्यात गंभीर परिणाम अंबाजोगाईत ४८ तासात २३ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

काल १२ तर दुपारपर्यंत दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार, अजूनही ९ मृतदेह शवागृहात असल्याची माहितीअंबाजोगाई (रिपोर्टर):- राज्यासह देशभरात फैलावलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे गंभीर परिणाम...

दुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

बीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...