जिल्हाधिकार्यांचे तहसिलदार,गटविकास अधिकारी यांना संयुक्त आदेश
बीड (रिपोर्टर) नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी सात दिवसाच्या आत विशेष सभा लावून या निवडी कराव्यात असे आदेश आज जिल्हाधिकार्यांनी तहसिलदार आणि बिडीओ यांनी सयुंक्तरित्या दिल्या आहेत. बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या पार पडल्या आहेत. निवडणुक झालेल्या ग्रामपंचयातीच्या मुदती या 24 आणि 30 डिसेंबर रोजी संपत आहे.
ग्रामपंचायतच्या सरपंचाची निवड ही थेट जनतेतून झाली आहे. जनतेतून निवडणुन आलेल्या सरंपचाने उपसरपंच निवडीसाठी आपला ग्रामपंचायतीच्या सदस्यांची विशेष सभा लावून ही निवड करावयाची असते. मात्र ही विशेष सभा लावण्यासाठी तहसिलदारांनी निवडुण आलेल्या सरपंचाला आदेश दयावे लागतात. या आदेशाबाबत जिल्हाधिकार्यांनी स्वतंत्रपणे नोटीफिकेशन काढून तसे आदेश जिल्ह्यातील तहसिलदार आणि गट विकास अधिकारी यांना द्यावे लागतात. आज जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीच्या उपसरंपच निवडीसाठी तहसलिदार यांनी तात्काळ सरपंचाना पत्र देवून ही सभा पत्र मिळाल्यापासून तात्काळ सात दिवसाच्या आत लावावी आणि आपल्या ग्रामपंचायतच्या उपसरंपचाची निवड करावी या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नवनियुक्त सरपंच असतात. उपसरपंच निवडीच्या विशेष सभेसाठी निरीक्षक म्हणून विस्तार अधिकारी पंचायत समिती किंवा तत्स्यम अधिकार्यांना उपस्थित ठेवावे असेही आदेशात म्हटले आहे.
समान मते पडल्यास एका विशेष मतांचा अधिकार सरपंचाला
उपसरपंचाच्या निवडीमध्ये निवडुण आलेल्या ग्रामपंचायत सदस्यातून ही निवड करावयाची असते. जर उपसरपंच निवडीमध्ये या विशेष सभेत उपसरपंच पदासाठी एका पेक्षा जास्त अर्ज आल्यास जर समान मते पडली तर एक विशेष मत देण्याचा अधिकार ग्राम विकास विभागाने निवडुण आलेल्या थेट सरपंचाला दिला आहे.