बीड (रिपोर्टर) कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. काल आरोग्य विभागाने जिल्हाभरातील 5899 संशयीतांचे स्वॅब घेतले होते. त्याचा अहवाल दुपारी प्राप्त झाला असून यामध्ये तब्बल 711 जण बाधीत आढळून आले आहेत. तर 5188 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter
बाधीतांमध्ये अंबाजोगाई 158, आष्टी 102, बीड 189, धारूर 11, गेवराई 54, केज 45, माजलगाव 56, परळी 44, पाटोदा 22, शिरूर 16 आणि वडवणी तालुक्यात 14 रूग्ण आढळून आले आहेत.