परळी (रिपोर्टर) दिव्यांग, विधवा, परित्यक्ता ज्येष्ठ नागरिक यांना लाभ मिळवून देणार्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने या घटकांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांच्या विविध मागण्यांसाठी परळी तहसील कार्यालयावर 26 डिसेंबर रोजी दिव्यांगाचे कैवारी तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांच्या नेतृवाखाली तीव्र आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यावेळी दिव्यांग बांधव या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.
आंदोलनातील मागण्या वरील सर्वांना अंत्यादोयामध्ये (2 रू. प्रति किलो गहू व 3 रुपये प्रति किलो तांदूळ) समावेश करून घ्यावा. तहसीलद्वारे देण्यात येणार्या पगारी नियमित करणे व कमी जास्त न करणे., सरसकट घरकुल देण्यात यावे, नगर परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचा 5% निधी नियमित वाटप करावा, दिव्यांगांना यु पी आय डी कार्ड घरपोच देण्यात यावे, रेशन कार्ड ऑनलाइन करून देणे व फाटलेल्या रेशन कार्ड बदलून देणे. या मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे.
या अंदोलनात दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. विविध मागण्यांसाठी आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत दिव्यांगाच्या विविध मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे अंदोलन सुरू राहणार असल्याचे डॉ. संतोष मुंडे यांनी सांगितले आहे.