परळी वैजनाथ प्रतिनिधी
जेष्ठ पत्रकार दिलिप बद्दर यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांचे बीड जिल्ह्यातील सांय दैनिक बीड रिपोर्टर चे संपादक शेख तययब यांनी सांत्वन केले.
दै.सामना व दै.लोकाशाचे परळी प्रतिनिधी दिलिप बद्दर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले असुन यामुळे बद्दर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.दिलिप भाऊ बद्दर यांनी आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिला.लोकहितासाठी त्यांनी आपली लेखणी चालवली अश्या पत्रकाराला आज आपण मुखलो आहोत या शब्दात बीड जिल्ह्यातील सांय दैनिक बीड रिपोर्टर परिवारा वतीने यांनी शोकभावन व्यक्त करत बद्दर कुटुंबाचे सांत्वन केले.














