बीड (रिपोर्टर) जागतिक पातळीवर कोरोनाचा नवा व्हेरियंट बी7 ची चर्चा होऊ लागली आहे. काही देशांमध्ये या व्हेरियंटचे पेशंट आढळून येऊ लागले आहेत. खबरदारी म्हणून आपल्याकडे चाचणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले. त्यानुसार आजपासून जिल्हा रुग्णालयातील कर्मचार्यांसह रुग्णालयात अॅडमिट असलेल्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची चाचणी करण्यात येत आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोना जवळपास संपल्यात जमा होता. पेशंट कुठेही आढळून येत नव्हते. मात्र जागतिक पातळीवर कोरोनाचा नवा व्हेरियंट बीसेव्हनची चर्चा होऊ लागली आहे. हा व्हेरियंट सक्रिय असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून चाचण्या करण्याचे आदेश केेंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने आरोग्य प्रशासनाला दिले. आजपासून जिल्हा रुग्णालयात चाचण्यांना सुरुवात करण्यात आली आहे. कर्मचार्यांसह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची चाचणी करण्यात येत आहे.