Sunday, July 25, 2021
No menu items!
Homeकोरोनाधक्कादायक ! अंबाजोगाईत एकाच दिवशी १२ बाधितांचा मृत्यू अधिष्ठातांच्या समयसुचकतेमुळे ४० रुग्णांचे...

धक्कादायक ! अंबाजोगाईत एकाच दिवशी १२ बाधितांचा मृत्यू अधिष्ठातांच्या समयसुचकतेमुळे ४० रुग्णांचे जीव वाचले


अंबाजोगाई (रिपोर्टर):- कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या अंबाजोगाईत बाधित रुग्णांची अत्यंत वाईट स्थिती असून काल काल पासून आज सकाळपर्यंत अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार घेणार्‍या बारा कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.यात बीड रुग्णालयातील 3 मृत्यूचा समावेश आहे यातील आठ जणांचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला असून चार जणांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. येथील अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव सुखरे यांच्या सतर्कतेमुळे अंबाजोगाई रुग्णालयात उपचार घेणारे ४० रुग्णांचा जीव वाचला गेला आहे.

रिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter


थरकाप उडवणार्‍या या घटनेने बीड जिल्ह्यात कोरोनाचं गांभीर्य अधिक वाढवून ठेवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड आणि अंबाजोगाईमध्ये कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय वाढताना दिसून येत आहे तर अंबाजोगाई रुग्णालयात उपचार घेणार्‍या कोरोना बाधितांच्या मृत्युची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. काल दुपारी दोन वाजल्यापासून आज सकाळपर्यंत अंबाजोगाई रुग्णालयात उपचार घेणार्‍या बारा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून अन्य चौघांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. एकीकडे गंभीर रुग्ण मृत्युच्या दारात असताना काल दुपारनंतर अचानक अंबाजोगाई रुग्णालयातला ऑक्सिजन संपायच्या मार्गावर होतं आणि लातूर येथून पुरवठा होणारा ऑक्सिजनचा पुरवठा होत नव्हता. हे लक्षात आल्यानंतर दवाखान्याचे अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव सुकरे यांनी वेळ न दवडता स्वत:हून लातूर गाठले आणि त्या ठिकाणी विनंती अथवा सर्व प्रयत्नांच्या परिकाष्ठा करत मसुखरे यांनी तात्काळ अंबाजोगाईसाठी ऑक्सिजनची व्यवस्था केली. त्यामुळे ऑक्सिजनवर असलेल्या चाळीस गंभीर रुग्णांचे जीव सुखरे यांच्या समयसुचकतेमुळे वाचले. अंबाजोगाई रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांमध्ये वृद्धांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आज जे १२ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत त्यातील बहुतेकांचे वय ६० पेक्षा जास्त आहे तर दोन-तीन लोकांचं वय हे पन्नाशीच्या आतलं आहे.


बीडमध्ये तिघांचा मृत्यू
बीडमधील कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेणार्‍या तिघांचा गेल्या १२ तासात मृत्यू झाला असून त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून दोघांचा निगेटीव्ह आहे. गेल्या २४ तासात मृत्यूची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!