नागपुर (प्रतिनिधी):- अमृत अटल योजने अंतर्गत बीड शहराला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा मुबलक पाणी पुरवठा करण्याचा मुख्य उद्देश ठेवून 2017 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 114 कोटी 63 लाख रूपयांची अमृत अटल पेयजल योजना बीड शहराला मंजुर करून दिली, यामुळे शहरातील नागरिकांना खुप मोठा दिलासा मिळाला होता. या योजनेच्या माध्यमातून 29 हजारापेक्षा जास्त पाणी पुरवठा कनेक्शन होणार असून आत्तापर्यंत जवळपास 22 हजारपेक्षा जास्त पाणी पुरवठ्याचे कनेक्शनचे काम पुर्ण झाले असून शहरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असून योजनेचे काम मोठ्या प्रमाणावर पुर्ण झालेे आहे. पण वीज कनेक्शन अभावी ही महत्त्वकांशी योजना गेल्या कित्येक महिन्यापासून रखडली असून आज नागपुर अधिवेशन प्रसंगी आ.संदिप क्षीरसागर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहात असतांनी या योजने संदर्भात मुद्देसुद माहिती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. योजना थांबविण्याचे कारण सांगुन मंत्री मा.ना.श्री.उदय सामंत साहेब यांच्यासमोर हा मुद्दा उपस्थित करून तारांकित प्रश्न मांडला. यावर मंत्री ना.उदय सामंत यांनी तातडीने ही योजना पुर्ण करण्याचे आदेश सभागृहात दिले. आ.संदीप क्षीरसागर यांच्या या प्रयत्नामुळे बीड शहरातील लाखो शहरवासियांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असून लवकरच बीड शहराला दोन दिवसाआड शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे.