परळी (रिपोर्टर) राज्यात व देशात लव जिहादच्या घटना सातत्याने घडत आहेत. यासाठी कठोर कायदा असावा तसेच धर्मांतरणाला ही बंदी घातली पाहिजे.लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोध कायदा करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी परळीत हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात परळीतील व्यापारी स्वयंस्फूर्तीने
जबरदस्तीने असो किंवा मर्जीने कोणत्याही प्रकारचे धर्मांतरणास परवानगी नसावी. प्रत्येकाने आपापल्या धर्माचे पालन करावे व इतर धर्मामध्ये ढवळाढवळ करु नये. तसेच लव जिहाद च्या नावाखाली अनेक तरुणींना फसवून, नादाला लावून पुन्हा हत्या केल्या गेल्या आहेत. त्यांच्या गुन्हेगाराना तातडीने फाशी देण्यात येण्यासाठी कठोर कायदा करावा या मागणी साठी हिंदू समाजाचा विराट असा मुकमोर्चा काढण्यात आला.हा मोर्चा राणी लक्ष्मीबाई टॉवर पासून सुरू झाला तो तहसील कार्यालयाच्या प्रांगणात धडकलायावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णा कृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महिलांनी मोर्च्याला संबोधन केले तर महिलांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिल्या. यावेळी सर्व स्थारातील महिलांनी या मोर्च्यात सहभाग नोंदवला तर मोठ्या प्रमाणात परळी पंचक्रोशीतील पुरुष या मोरच्यात सहभागी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. तर मोर्च्यासाठी सर्व बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली.