ऊस उत्पादक शेतकर्यांच्या दारात आ संदीप क्षीरसागर शिरूर तालुक्यात झंझावात
शिरूर कासा (रिपोर्टर) बीड -विधानसभेच्या निवडणुकीत बीड आणि शिरूर कासार तालुक्यातील मायबाप मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकून विधानसभेत पाठविण्याचे काम केले आणि त्या दरम्यानच मला खरी ऊस उत्पादक शेतकर्यांची व्यथा कळाली त्याचवेळी मी मनाशी खून गाठ बांधली होती गजानन साखर कारखाना सुरू करील हाच माझ्या आमदार केतील सर्वात मोठे उद्दिष्ट निवडून येताच मी ठरवले होते. गजानन साखर कारखाना सुरू झाला मायबाप शेतकर्यांना आणि दादांना दिलेले वचन पाळण्याचे समाधान खूप मोठे असे भावनिक उदगार आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिरूर तालुक्यातील चव्हाणवाडी आणि शिरापूर धुमाळ या गावात शेतकर्यांच्या दारात जाऊन संवाद साधताना व्यक्त केले.
गेल्या अनेक वर्षापासून प्रस्थापितांनी गजानन साखर कारखान्याच्या माध्यमातून सुडाचे राजकारण केले होते. आणि चेअरमन या नात्याने दादांना बदनाम केले आणि कारखाना बंद पाडण्याचे काम खापर दादांच्या माथी फोडले पण मतदार संघातील मायबाप जनतेने प्रस्थापितांचा कुटील डाव उधळून लावला आणि या मतदार संघातून मला विधानसभेत पाठवण्याचे काम केले. गजानन साखर कारखाना सुरू करणे हे माझे आमदार कितले मुख्य उद्देश होते ते पूर्ण झाल्याचे समाधान आहे म्हणूनच आज ताट मानेने शेतकर्यांच्या दारात येऊन संवाद साधतोय असे वक्तव्य आमदार संदीप क्षीरसागर शिरूर तालुक्यातील शिरापूर धुमाळ आणि चव्हाणवाडी या गावात शेतकर्यांच्या भेटी प्रसंगी केले.