बीड (रिपोर्टर) रोजगार हमी योजना अंतर्गत कामावर असणार्या सर्व मजुरांचे आधारलिंक करण्याचे आदेश शासनाचे आहेत. बीड तालुक्यात 34 मजूर अॅक्टीव्ह असून आतापर्यंत 23 हजार मजुरांचे आधारलिंक पुर्ण झाले. आणखी दहा हजार मजुरांचे आधारलिंक होणे बाकी आहे. हे सर्व आधारलिंकचे काम पं.स.चे तीन ऑपरेटर व दोन एपीओंनी पुर्ण केले. तहसील आणि कृषी विभागाच्या ऑपरेटरने मात्र आधारलिंककडे दुर्लक्ष केले. त्यांनी एकही आधार लिंक केले नसल्यामुळेच 34 हजाराचा आकडा पुर्ण होऊ शकला नाही.
रोजगार हमी योजनेतील गैरप्रकार टाळण्यासाठी अॅक्टीव असलेल्या मजुरांचे आधारलिंक करण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. बीड तालुक्यात 34 हजार मजूर असून बीड पंचायत समितीमधील तीन ऑपरेटर आणि दोन एपीओंनी आतापयर्ंत 23 हजार आधार लिंक केेले. आधारलिंक करण्याची जबाबदारी तहसील, कृषी विभाग यांच्यावर सुद्धा सोपविण्यात आली होती. तसे निर्देश जि.प.च्या सीईओंनी दिले होते. मात्र याकडे तहसील व कृषी विभागाच्या ऑपरेटरने दुर्लक्ष केले. त्यांनी एकही आधार लिंक पुर्ण केले नाही. सर्व आधार लिंक पंचायत समितीच्या ऑपरेटरांनी पुर्ण केले. 34 हजार मजुरांचे आधारलिंक झाल्याशिवाय कुठलेही पेमेंट सुटणार नाही, आतापर्यंत हा आकडा पुर्ण व्हायला हवा होता मात्र तहसीलमधील ऑपरेटरच्या हलगर्जीपणामुळे काम पुर्ण होऊ शकले नाही. याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालून तात्काळ आधारलिंकचे काम पुर्ण करण्याचे निर्देश द्यावेत व फळबाग, घरकुल, रस्त्याच्या कामाचे पेमेंट सोडावे, अशी मागणी केली जाऊ लागली आहे.