बीड (रिपोर्टर) तीन वर्षांपासून जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असल्याने उसाचे क्षेत्र वाढले. यावर्षी पावसामुळे दिवाळीनंतर कारखाने सुरू झाले असले तरी उसाची तोड वेगाने सुरू आहे. डिसेंबरअखेर बीड जिल्ह्यात 12 लाख 62 हजार मे.टन उसाचे गाळप झाले. गतवर्षी ऊसउत्पादक शेतकर्यांची गाळपासाठी चांगलीच फरपट झाली होती. जूनपर्यंत काही कारखाने सुरू राहिले होते. यंदा मात्र शेतकर्यांची तितकी फरपट होणार नसल्याचे दिसून येत आहे. बीड तालुक्यात गजानन कारखाना सुरू झाला. त्याचबरोबर काही गुर्हाळही सुरू झाले. गतवर्षी ठराविक कारखानेच सुरू असल्यामुळे ऊसउत्पादक शेतकरी अडचणीत आले होते.
बीड जिल्ह्यात उसाचं क्षेत्र वाढलं. गेल्यावर्षी एक लाखापेक्षा जास्त हेक्टरमध्ये उसाची लागवड होती. ऊस तोडणीसाठी शेतकर्यांना कारखानदारांकडे चकरा माराव्या लागल्या होत्या. गेवराई तालुक्यात एका शेतकर्याने ऊस जात नाही म्हणून आत्महत्या केली होती. सर्व शेतकर्यांचा ऊस गाळप करण्याचा काम गतवर्षी करण्यात आले. यावर्षी उसाचं क्षेत्र जास्तच आहे, मात्र बीड तालुक्यात गजानन सहकारी साखर कारखाना सुरू झाल्याने ताण कमी होणार आहे. काही गुर्हाळाचे कारखाने सुरू झाले. या गुराळासाठी हजारो हेक्टर ऊस लागणार आहे. यावर्षी दिवाळीनंतर ऊस तोडणीला सुरुवात झाली. डिसेंबरअखेर 12 लाख 62 हजार मे.टन उसाचे गाळप झाले आहे.