बीड (रिपोर्टर) आष्टी, कडा येथील लोखंड विक्री करणार्या व्यापार्यांच्या दुकानांवर आयकर विभागाने छापे मारल्याचे वृत्त असून रात्रीपासून एक टीम तीन ठिकाणी कागदपत्रांची तपासणी करत आहे. दुपारपर्यंत या प्रकरणी अधिकृत माहिती मिळाली नसली तरी आयकर विभागाच्या या धडक मोहिमेमुळे जिल्हाभरातील व्यापार्यात खळबळ उडाली आहे.
जीएसटी चोरी प्रकरणाची चर्चा मराठवाड्यात अधिक प्रमाणात होते. बीड जिल्ह्यामध्ये लोखंडाचा व्यापार करणारे मोठ्या प्रमाणावर जीएसटी चुकवतात, अशी सातत्याने ओरड होते, त्यावर चर्चाही होते. आता मात्र आयकर विभागाने बीड जिल्ह्यात लक्ष घातल्याचे दिसू नयेते. रात्रीपासून आष्टी येथील एक आणि कडा येथील दोन लोखंडाच्या दुकानांवर आयकर विभागाच्या अधिकार्यांनी छापा मारला आहे. या ठिकाणी कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात येते. या वृताला अधिकृत दुजोरा संबंधित विभागाकडून अद्याप मिळालेलां नाही. मात्र या कारवाईच्या चर्चेने बीड जिल्ह्याच्या व्यापार्यात खळबळ उडाली आहे.