बीड (रिपोर्टर) कर्तव्यात कसूर केल्याच्या कारणावरून शिक्षण विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी डी.बी.भड आणि वरिष्ठ सहायक श्रीमती आर.एन. उगलमुगले यांना मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी निलंबीत केले आहे.
वरिष्ठ सहायक श्रीमती उगलमुगले यांच्याकडे टपाल विभाग बघणे, आवक-जावकच्या नोंदी करणे यासह आदी कामे सोपविले होते. ही कामे त्यांनी पार पाडलेले नाहीत. याबाबत शिक्षणाधिकार्यांमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना खुलासा करण्याबाबत नोटीस बजावली होती. या नोटीशीला श्रीमती उगले यांनी उत्तर देऊन जो खुलासा केला तो खुलासा समाधानकारक नसल्याच्या कारणावरून मुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी उगलमुगले यांना निलंबीत करून निलंबण काळातील त्यांचे मुख्यालय पंचायत समिती, गेवराई या ठिकाणी ठेवले आहे तर कनिष्ठ प्रशासन अधिकारी डी.बी. भड यांनी प्रशासन अधिकारी या नात्याने शिक्षण विभागातील कर्मचार्यांवर अंकुश ठेवणे, कोणाच्या रजा आहेत, कोण उपस्थित आहे, कोण उशीरा येते याबाबत काम करणे अपेक्षीत असताना ते स्वत:च कुठलेही कारण न देता कार्यालयात उशीरा येत असत. कधी कधी रजा न देता उपस्थित राहत नसत. या कारणावरून त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्या नोटीशीला खुलासा वजा उत्तर दिले. ते उत्तरही असमाधानकारक असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भड यांना निलंबीत केले आहे.
दुसरीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पवार हे शिक्षण विभागात अनेक कारवाया त्यांनी केले आहे. शिक्षण विभागाला शिस्त लावण्यासाठी ते कठोर पावले उचलत आहेत. मात्र दुसर्या विभागातही पवार यांनी शिस्त लावण्यासाठी लक्ष द्यावे, की शिक्षणाधिकारी यांना शिक्षण विभागातले काम निटपणे जमत नसेल यामुळे कारवाई होतात. याबाबत कर्मचार्यात चर्चा सुरू आहे.