बीड(रिपोर्टर): औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत हॅट्रिक मारून राज्यभरात चर्चेत असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यावेळीही विजयाचा चौकार मारत विक्रम नोंदवणार असल्याचे चित्र सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे. स्व.वसंतराव काळे यांच्या कर्तव्यकर्माला आदर्श मानून आ.काळे यांनी गेल्या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गी लावले, विधान परिषदेमध्ये शिक्षकांच्या प्रश्नासह शिक्षण क्षेत्रावर काम करताना सातत्याने आवाज उठवला, त्याचे फलीत आजपर्यंतच्या निवडणूकांमध्ये त्यांना मिळून आले आहे. यावर्षीच्या निवडणूकीतही विक्रम काळे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांना आहे तर विक्रम काळेंनाच नेतृत्व म्हणून पाहणारे शिक्षक मतदारही काळेंना निवडून आणण्यासाठी उत्साही असल्याचे दिसून येत आहे.
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा कायम दबदबा राहिलेला आहे. गेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने पत्की नावाच्या उमेदवाराला पुरस्कृत करून विक्रम काळे यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. काही अपक्ष उमेदवारांना उभे करून काळेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मतदार संघाचं कर्तृत्व कर्मातून नेतृत्व करणार्या विक्रम काळे गेल्या निवडणुकीत 25 हजारापेक्षा जास्त मतांनी विजयी झाले होते. आतापर्यंत विक्रम काळे हे या मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत. विविध संस्थांसह मराठवाड्यातील 80 टक्केपेक्षा जास्त शिक्षक विक्रम काळेंना आपलं नेतृत्व मानत आले आहेत. गेल्या पंधरा वर्षांपुर्वी या मतदारसंघाचं नेतृत्व स्व. वसंतराव काळे हे करत असायचे. त्यांचे कर्तृत्व कर्म आणि त्यांच्या सकारात्मक दृष्टीकोनाला शिदोरी समजून विक्रम काळे यांनी गेल्या पंधरा वर्षांच्या कालखंडामध्ये विजयाची हॅट्ट्रीक मारत शिक्षकांसाठी काम केले आहे. विधान परिेदेमध्ये सातत्याने शिक्षकांच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे. शिक्षण क्षेत्रात काम करताना त्यांनी सातत्याने शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या मागण्यांना अधिक महत्व दिलं आहे. आता पुन्हा ते विजयाचा चौकार मारण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले असून यावर्षीही विक्रम काळे हे विक्रमी मतांनी विजयी होणार असा विश्वास राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांबरोबर मतदारांना असल्याचे दिसून येते. प्रतिस्पर्धी उमेदवाराला चितपट करण्याइरादे मतदारच विक्रम काळेंच्या कामाची नोंद चर्चेत आणत आहेत.