मराठवाड्यातील प्रलंबीत रेल्वेमार्गासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी
माजलगाव : रिपोर्टर
नगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी व मराठवाड्यातील प्रलंबीत रेल्वेमार्गासाठी येणाऱ्या देशाच्या अर्थ संकल्पात भरीव आर्थिक तरतूद करून रेल्वेमार्ग लवकर पूर्ण करण्यात यावेत यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेने माजी शिक्षक आमदार डी. के.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजलगाव तहसील कार्यालयासमोर मूक आंदोलन करण्यात आले
मराठवाडा जनता विकास परिषदेचे केंद्रिय अध्यक्ष माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केलेल्या आवाहना नुसार मराठवाडा जनता विकास परिषदेने जनतेचे,महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 31 जानेवारी रोजी मराठवडाभर मूक आंदोलनाचे आयोजन केले होते
नगर-बीड-परळी,सोलापूर -बीड-जळगाव रेल्वेमार्ग लवकर पूर्ण करण्यात यावेत जालना-खामगाव,औरंगाबाद-चाळीसगाव, परभणी-औरंगाबाद दुहेरीकरनाला ,नांदेड-लातूर रोड रेल्वे जोडमार्गासाठी,नांदेड-देगलूर-बिदर रेल्वेमार्गाला पुरेसा निधी देण्यात यावा तसेच वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग गतीने पूर्ण करण्यात यावा दक्षिण-मध्यविभाग सेंट्रल झोनला जोडा तसेच घाटनांदुर-अंबाजोगाई-दौंड ह्या सर्व्हे झालेल्या रेल्वेमार्गसाठी आर्थिक तरतूद करण्यात यावी या बाबतचे निवेदन माजलगाव तहसीलदार श्रीमती वर्षा मनाळे मॅडम यांना देण्यात आले या मूक आंदोलनात मराठवाडा जनता विकास परिषदेचे मार्गदर्शक माजी आमदार डी.के. देशमुख, सचिव सुमंत गायकवाड, संपादक शिरीष देशमुख, प्रा.पी.के.देशमुख,डॉ. सचिन देशमुख, आर.एन.सावंत,वसंत पाटील,के.व्ही.गाजरे, गणेश मुळाटे, हिमांशू देशमुख, राजाभाऊ शिवणकर,डी.बी.रामुळे,सुभाष रासवे, सयद लालाभाई,गजानन खामकर,अनिल झगडे,प्रकाश पोतदार सह विकास परिषदेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.