Friday, October 22, 2021
No menu items!
Homeराजकारणप्रखर - दादागिरीला चाप,ममतांचं महत्व वाढलं !!

प्रखर – दादागिरीला चाप,ममतांचं महत्व वाढलं !!


पाच राज्यातील निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी जाहीर झाला. निवडणुका पाच राज्यातील असल्या तरी सगळं लक्ष फक्त आणि फक्त पश्‍चिम बंगाल या राज्यावर होतं. पश्मिच बंगालचा निकाल ममतांच्या बाजुने लागला. ममतांना हरवण्यासाठी भाजपाने काय, काय नाही केलं? गेल्या एक वर्षापासून भाजपा पश्‍चिम बंगालमध्ये जावून वातावरण निर्माण करत होतं. भाजपाचे कार्यकर्ते आणि नेते ममता यांना काहीबाही बोलून त्यांचा अवमान करत होते. निवडणुकीच्या काळात भाजपाने ममता यांच्या अनेक कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना फोडून आपल्या पक्षात घेतलं. भाजपा आणि तृणमुल काँग्रेस असं दुहीचं राजकारण सुरु झालं होतं. भाजपाने इतका अकांड-तांडव माजवून ठेवला होता की, बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. प्रचाराच्या काळात अनेक मतदार संघात तणावाचे वातावरण बनले होते. कुठल्याही परस्थितीत ममता यांचा पराभव करायचा हा चंगच भाजपाने बांधला होता. पंतप्रधान मोदी यांनी बंगालमध्ये 20 पेक्षा जास्त सभा घेतल्या. गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपाचे बडे नेते बंगालमध्ये ठाण मांडून होते. शहा यांनी 200 पेक्षा जास्त जागा भाजपाला मिळेल असाच दावा केला होता. दोन अंकी आकडा भाजपाला गाठता आला नाही. पंच्चाहत्तरीतच भाजपाला ममतांनी गुंडाळून टाकले. भाजपाच्या जागा वाढल्या असल्या तरी भाजपाने जी सर्व शक्ती बंगालमध्ये खर्ची केली. त्या मानाने त्यांच्या पदरात काही पडलं नाही. निवडणुकीच्या काळात ममता यांच्या पायाला दुखापत झाली होती. अशा परस्थितीत ममता यांनी   न खचता व्हीलचेअरवर बसून बंगालची निवडणुक हाताळली. एका पायावर उभा राहून ममतांनी भाजपाला पायाखाली लोळवलं.
डावे-काँग्रेस शुन्यात
पश्‍चिम बंगाल हा डाव्यांचा गड मानला जात होता. या राज्यात जवळपास तीस वर्ष एकहाती डाव्याकडे सत्ता होती. गेल्या पंधरा वर्षापुर्वी ममता यांनी डाव्यांना सुरुंग लावलं, डाव्यांची सत्ता उलथून टाकली. एक महिला  असतांना डाव्यांचा पुरता सुफडा साफ ममता यांनी करुन संपुर्ण राज्य स्वत:च्या ताब्यात घेतलं. या निवडणुकीत डावे आणि काँग्रेस पक्षाचं नामोनिशान राहिलं नाही. साधं खातं ही या दोन्ही पक्षांना उघडता आलं नाही. काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष खा. राहूल गांधी यांनी बंगालमध्ये अनेक प्रचार सभा घेतल्या. शेवटच्या क्षणी त्यांनी कोरोनामुळे बंगालमधील सर्व सभा रद्द करुन भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. बंगालमध्ये काँग्रेसला चेहरा नाही, जेणे करुन त्या चेहर्‍याकडे पाहून तरी दहा-वीस जागा निवडून येतील अशी परस्थिती नव्हती, त्यामुळेच काँग्रेस या निवडणुकीत हद्दपार झाली. काँग्रेस पुर्णंता हारली असली तरी डाव्या पक्षांच्या काही तरी जागा निवडून येईल असं वाटत होतं, पण त्यांच्या वाट्याला ही भोपळाच आला. दुसर्‍याच्या काठीने साप मारण्याचा आनंद नक्कीच काँग्रेस, डाव्या पक्षांना झाला असणार, यात या दोन्ही पक्षांचं मोठं नुकसान झालं. डावे आणि काँग्रेस यांचा नंबर एकचा शत्रू हा भाजपा आहे. या पक्षाला हरवणं हे या दोन्ही पक्षाचं लक्ष्य होतं, भाजपापुढे आपली ताकद कमी पडेल,म्हणुन की काय डावे आणि कॉग्रेंसने आपली तलवार म्यान करत ममता बँनर्जी यांच्या विजयासाठी रान मोकळं सोडून दिलं होतं का? काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या उमेदवारांना चांगली मते पडली असती तर नक्कीच ममता यांचं मोठं नुकसान झालं होतं. ममतांचं नुकसान टाळण्यासाठीच डावे आणि कॉग्रेसने सयंमाने घेतलं आहे की काय असंही वाटू लागलं.  
जनता ममतांच्या पाठीशी
ममता यांनी पश्‍चिम बंगालमध्ये काय केलं? ममता यांनी ठरावीक लोकांचाच विकास केला? ममता बांगलादेशी  लोकांना आश्रय देत आहे, यासह अन्य प्रचाराचे मुद्दे भाजपाने निवडणुकीत वापरले. पश्‍चिम बंगालमध्ये मुस्लिमांची संख्या 37 टक्कयापर्यंत आहे. त्यामुळे भाजपाने जाती-धर्माच्या कार्डचा वापर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगला देशात जावून त्याठिकाणी बांगला देशाच्या स्वातंत्र्य लढयात आपलं योगदान असल्याची फेकाफेकी करुन स्वत:चा खोटापणा दाखवून दिला. मोदी यांचा बांगला देशाचा दौरा केवळ निवडणुकीसाठीच होता. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. बंगालचे लोक मोदी,शहा यांच्या कुटनितीच्या राजकारणाला बळी पडले नाहीत. लोकांना भाजपापेक्षा ममता योग्य वाटल्या आणि ममतांना गत निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत दोन टक्कयाने मतांची टक्केवारी वाढली. भाजपाचे नेते बंगालमध्ये सत्तेचा दावा करत होते. त्यात त्यांनी बंगाल आपच्याच हाती राहणार असा अर्विभाव निर्माण केला होता. त्यांच्या या अतिमहत्वकांक्षाला जनतेने घरचा रस्ता दाखवला. मिथून चक्रवर्ती यांना भाजपाने आपल्या पक्षात घेवून काही बदल होईल याची अपेक्षा बाळगली. मिथून यांनाही लोकांनी नाकारले. त्याचा कसलाही परिणाम झाला नाही. बंगालच्या लोकांची माया पुर्णंता ममता यांच्यावरच होती, हे निकालातून स्पष्ट झालं.
जुमानलं नाही
निवडणुका हा जणू काही भाजपावाल्यांनाच प्राणच आहे हे दिसून येतं. दुसरं काही ही होवू पण निवडणुका आपणच जिंकल्या पाहिजे असं भाजपाची व्युहरचना असते. कोरोनाची दुसरी लाट आलेली असतांना पाच राज्यात निवडणुका घोषीत करण्यात आल्या. या निवडणुकीत भाजपासह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी लाखांच्या संख्येने प्रचार सभा घेतल्या. निवडणुक आयोगाला ही कोरोनाचं भान राहिलं नाही. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मद्रास कोर्टात निवडणुकीबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यात न्यायालयाने निवडणुक विभागाला चांगलेच झापले. निवडणुक अधिकार्‍यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करायला हवा असा संताप व्यक्त केला. निवडणुका झाल्यानंतर या पाच ही राज्यात कोरोना कहर सुरु झाला. यापुर्वी ही या पाच राज्यात कोरोनाची लागन झालेली होती, पण त्याची संख्या समोर येत नव्हती. निवडणुका पार पडेपर्यंत संख्या समोर येवू नये अशीच योजना केंद्रानेे आखली होती का असा प्रश्‍न पड्ल्याशिवाय राहत नाही. जेव्हा कोरोनाचा जास्त उद्रेक होवू लागला,तेव्हा राहूल गांधी यांनी आपल्या सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा भाजपाने चमत्कारीक टिका केली. गांधी यांच्या सभेला लोकच नसतात म्हणुन त्यांनी आपल्या सभा रद्द केल्या असा आरोप केला. यावरुनच भाजपाच्या प्रवक्तयाच्या बुध्दीची कीव करावी वाटते. लोक मरत असतांना स्वत:च्या राजकारण्यांची भाकर भाजण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे, म्हणजे हा किती दुर्देवी प्रकार म्हणायचा.
ताळ्यावर आणलं
बंगाल हे मोठं राज्य आणि या राज्यात आपलं बस्तान बसलं पाहिजे ही भाजपाची पुर्वीपासूनच अपेक्षा होती. बंगाल सहजा सहजी आपल्या ताब्यात येणार नाही हे भाजपाला माहित होतं, पण तरी भाजपाने हे राज्य ताब्यात घेण्यासाठी साम,दाम, दंडाचा वापर केला. एकीकडे गरीबी आणि बेरोजगारीमुळे देशातील जनता त्रस्त असतांना दुसरीकडे निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च केला जात होता. बंगालच्या निवडणुकीत काय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते, ममता बॅनर्जी यांनी भाजपाला हारवण्यासाठी इतर अनेक समविचारी पक्षांची मदतही मागितली होती. तशी त्यांनी काही नेत्यांच्या भेटी देखील घेतल्या होत्या. ममता ह्या आक्रमक नेत्या आहेत. ममता म्हणजे बंगालची वाघीणच, या वाघिणीला राजकारणातून हद्दपार करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. मतांचे विभाजन व्हावे म्हणुन त्यांनी अनेक फासे टाकले होते, हे सगळे फासे उलटे पडले, खा. ओवीसी सारखे नेते बंगाल मध्ये दाखल झाले होते, पण तेथील जनतेने त्यांना जाती, धर्माच्या आधारावर थारा दिला नाही. प्रादेशीक पक्षांची ज्या-ज्या राज्यात सत्तास्थाने आहेत, त्या राज्यातील सत्तास्थांना हादरे देण्याचे आणि त्यांची सत्तास्थाने पुर्णंता उखडून टाकण्याची जी आघोरी राजनिती भाजपाने सुरु केली आहे. यात पश्‍चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांना राजकारणातून हाद्दपार करण्याचे मनसुबे बांधण्यात आले होते,पण ममतांनी भाजपाचा डाव पुर्णंता उधळून लावला. एकीकडेे फक्त एकट्या ममता आणि दुसरीकडे संपुर्ण भाजपा असं असतांना एकटया ममता भाजपाला पुरुन उरल्या, ही लढाई एैतिहासीक झाली आहे. ममतांनी विजयाची हॅट्रीक केल्याने त्यांच्या विजयाचा आनंद देशातील अनेक समविचारी पक्षांना झाला. चांगली जबरदस्त टक्कर ममता यांनी भाजपाला दिली आणि त्यात त्या यशस्वी झाल्या. भाजपाची दादागिरी’ हारली,त्याला जबरदस्त चाप बसली, आणि बंगालची माया(ममता) जिंकली. सध्या देशात भाजपाला तोडीस-तोड उत्तर देणारा नेता नाही. ममता यांनी जी कमाल करुन दाखवली. त्या कमालीचं कौतूक तर होतच आहे, पण एक निर्भय नेता म्हणुन आता ममता यांची देश पातळीवर चर्चा होवू लागली. ममता यांनी स्वत:च्या ताकदीवर 215 जागा निवडुन आणल्या आहेत. इतक्या जागा निवडून आणणं ही साधी बाब नाही. ममता यांनी तीन अंकी जागा खेचून आणल्या. ममता या पंतप्रधान मोदी,गृहमंत्री अमित शहा यांना भारी ठरल्या, त्यांनी  भाजपाला पाणी पाजल्याने त्यांचे राष्ट्रीय पातळीवर महत्व वाढले आहे.

Most Popular

error: Content is protected !!