नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात 22 शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळले
बीड (रिपोर्टर) राज्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना. कर्जमाफी करूनही शेतकरी आत्महत्या सुरुच आहेत. गेल्या आठ वर्षामध्ये मराठवाड्यात 7 हजार 444 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. 2023 या नवीन वर्षाच्या सुरुवातीला बीड जिल्ह्यात 22 शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळले. मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या या बीड जिल्ह्यात होऊ लागल्या. आत्महत्येचे सत्र रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कुठल्याही ंठोस उपाययोजना आखल्या जात नाहीत.
शेतकरी आत्महत्येचे सत्र 1980 पासून सुरू झाले. नापिकी, कर्जबाजारीपणा व शेतीमालाला नसणारा भाव यामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडून गेले. कर्जाचा बोजा कसा उतरवायचा या चिंतेतून शेतकरी आत्महत्या करू लागले. राज्यात सर्वाधिक आत्महत्या मराठवाड्यामध्ये होऊ लागल्या. त्यात बीड जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आहे. गेल्या आठ वर्षात 7 हजार 444 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली. नवीन वर्षातही आत्महत्या सुरुच आहेत. दीड महिन्यात बीड जिल्ह्यात 22 शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळले.