Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईमुख्यमंत्री ठाकरे अचानक हायकोर्टात

मुख्यमंत्री ठाकरे अचानक हायकोर्टात


लसीकरण कार्यक्रमाचा आढावा आणि न्यायमूर्तींची भेट

मुंबई (रिपोर्टर):- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अचानक मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले होते. हायकोर्ट परिसरातील लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री पोहोचले होते, अशी माहिती मिळत आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल देखील उपस्थित होते. जवळपास २० मिनिटांची ही भेट होती. त्यानंतर मुख्यमंत्री वर्षा निवासस्थानी रवाना झाले आहेत. भेटीचा हा कार्यक्रम हा पूर्वनियोजित होता.


गेल्या दोन-तीन दिवसांपासून उच्च न्यायालयाच्या आवारात लसीकरण कार्यक्रम पाड पडत आहे. याचा मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांनी आढावा घेतला. परंतु मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्त मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी हायकोर्टात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. ही सदिच्छा भेट असली तरी या भेटीला विशेष महत्त्व आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई उच्च न्यायालय कोरोना रुग्णांचा तक्रारी ऐकून घेत आहे. शिवाय बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्जनच्या तुटवड्याबाबत दाखल होणार्‍या याचिकांवर सुनावणी करत आहे. मुंबईमधल्या कोरोना परिस्थितीबाबत न्यायालयाची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.मुख्यमंत्री ठाकरे अचानक हायकोर्टात

Most Popular

error: Content is protected !!