दिल्ली (वृत्तसेवा): महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची आज सलग तिसर्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. शिंदे गटाकडून महेश जेठमलानी, मनिंदरसिंह, पटनायक बाजू मांडत आहे तर ठाकरे गटाकडून कपील सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी बाजू मांडत आहेत.
लोकांना विकत घेऊन महाराष्ट्रातले आघाडी सरकार पाडले असल्याचा युक्तीवाद कपील सिब्बल यांनी न्यायालयात केला. गुवाहाटीत बसून महाराष्ट्र सरकार संदर्भात निर्णय होऊ शकत नाही. आमदा विलीन झाले तरी मूळ पक्ष तसाच राहतो, असा युक्तीवाद देखील सिब्बल यांनी केला. सुनिल प्रभू यांनी जारी केलेल्या व्हिपचे आमदारांकडून उल्लंघन करण्यात आले. त्यांनी भाजप उमेदवारांना मतदान केले असे मत सिब्बल यांनी मांडले. शिंदे गटाचे आमदार 34 असले तरी त्यांच्यासमोर विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्राच्या केसचा परिणाम भविष्यावर होणार असल्याचे कपील यांनी न्यायालयात मांडले आहे. आज तिसर्या दिवशीही महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षवर युक्तीवाद सुरू आहे. दोन्ही गटांकडून चांगलीच खडाजंगी होत आहे.