Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडकॅनॉल रोडवरील पेवर ब्लॉक काढून थातूरमातूर लेप लावला

कॅनॉल रोडवरील पेवर ब्लॉक काढून थातूरमातूर लेप लावला


बीड (रिपोर्टर):- कधी नव्हे ते शहरात कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते बनवले जात आहेत. हे रस्ते बनवताना रस्त्याच्या मधोमध पेवर ब्लॉक टाकण्यात आले आहेत. मात्र ते टाकताना खालीवर बसवले होते. त्यामुळे त्याच्यावर दुचाकी स्वलीप होऊन मोठ्या प्रमाणावर अपघात होत होते. त्यानंतर नागरिकांच्या मागणीनुसार कॅनॉल रोडवरील पेवर ब्लॉक काढण्यात आले, त्या जागेवर निकृष्ट दर्जाची वाळू, सिमेंट आणि खडी वापरून थातूरमातूर लेप लावण्यात आला आहे. त्यामुळे संपुर्ण रस्त्यावर वाळू पसरली असून पेवर ब्लॉकच्या जागेवर खड्डे पडले आहेत.
बीड शहरात आतापर्यंत कधीच रस्ते बनवण्यात आले नाहीत. सुदैवाने शहरातील अनेक भागात कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते बनवण्याचे काम नगरपालिकेकडून हाती घेण्यात आले. मात्र हे रस्ते बनवताना अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. कॅनॉल रोडवर रस्त्याच्या मधोमध पेवर ब्लॉक टाकण्यात आले होते मात्र ते पेवर ब्लॉक बसवताना रस्ता आणि पेवर ब्लॉकची लेवल करण्यात आली नव्हती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुचाकी वाहने स्लीप होत होत्या. त्यामुळे हे निकृष्ट दर्जाचे पेवर ब्लॉक काढण्याचीमागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार हे पेवर ब्लॉक काढण्यात आले. त्याजागी निकृष्ट दर्जाची वाळू, सिमेंट आणि खडी टाकून ते बुझवण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!