बीड (रिपोर्टर) राज्य सरकारी कर्मचर्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी कालपासून पुकारलेला संपावर तोडगा न निघाल्याने सर्व कर्मचारी आजही संपावर असल्याने सर्व कार्यालयीन कामकाज विस्कळीत झाले होते. दरम्यान सरकार संपावर तोडगा काढत नसल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी सोडता सर्वच विभागाच्या कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज थाळीनाद आंदोलन केले.
राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने 2005 पुर्वीची पेन्शन योजना चालू करावी, म्हणून वर्ग 3 आणि 4 चे कर्मचारी संपावर आहेत. महसूल विभागाचे जवळपास 14 हजारच्या पुढे आणि जिल्हा परिषदेचे 12 हजार 120 कर्मचारी या संपात सहभागी झाल्यामुळे कार्यालयीन कामकाज विस्कळीत झाले असून सामान्य नागरिकांची तारांबळ उडाली आहे. प्राथमिक शिक्षकांच्या एका संघटनेने कालच माघार घेतली आहे तर जि.प.चे तीन शिपाई आणि दोन लिपिक जुन्या पेन्शन योजनेसाठी आम्ही संपात सहभागी होणार नाहीत, असेही मुख्य कार्यकारी अधिकार्यांना लिहून दिले आहे.