करोनो काळातील 2020-21 चे नॉन-क्रेमिलियर प्रमाणपत्र ग्राह्य धरणार; देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिला
आ.संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई (रिपोर्टर)- 2020 या काळात महाराष्ट्र शासनाने उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी जाहिरात काढली होती या बीड जिल्ह्यासह पूर्ण महाराष्ट्रातील हजारो युवकांनी परीक्षा दिल्या पण काही तांत्रिक अडचणीमुळे या पदाच्या मुलाखती होत नव्हते या करता एक शिष्टमंडळ नुकतेच आ.संदीप क्षीरसागर यांना भेटले होते. युवकांचे सर्व समस्या जाणून घेऊन आमदार संदीप क्षीरसागर यांनी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला या पाठपुराव्यास यश आले असून करोनो काळातीलच 20-21चे नॉन क्रेमिलेयर प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार असून महाराष्ट्रातील हजारो भावी उपनिरीक्षकांचा मुलाखतीचा मार्ग खुला झाला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दि. 28 फेब्रुवारी 2020 रोजी पोलिस उप निरीक्षक (पी.एस.आय.) या पदासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदरच्या जाहिरातीमध्ये नॉन-क्रेमिलेअर (एन.सी.एल.) प्रमाणपत्र कोणत्या आर्थिक वर्षाचे सादर करावे याबाबत कोणाताही उल्लेख अथवा खुलासा करणेत आलेला नाही. सदरच्या जाहिरातीनंतर सन 2020-21 मध्ये संपूर्ण देशभरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकिय कार्यालये बंद होती, त्यामुळे या काळामध्ये परीक्षार्थीना नॉन-क्रेमिलेअर (एन.सी.एल.) प्रमाणपत्र उपलब्ध झाली नाहीत. त्यानंतर अनेक परीक्षार्थीनी सदरचे प्रमाणपत्र त्या आर्थिक वर्षातील म्हणजेच सन 2021-22 मधील उपलब्ध केली आहेत. वरील संदर्भित पोलिस उप निरीक्षक पदा साठीच्या पूर्वपरीक्षा दि.4 सप्टेंबर 2021 रोजी व मुख्य परीक्षा दि. 11 व 25 सप्टेंबर 2022 मध्ये घेण्यात आल्या. त्यातून पात्र परीक्षार्थीच्या मुलाखती या दि.08 मार्च 2023 पासून सुरु करण्यात आल्या आहेत. परंतू या मुलाखतीदरम्यान संबंधित परीक्षार्थीकडून सन 2019-2020 या आर्थिक
वर्षातील नॉन क्रेमिलेअर (एन.सी.एल.) प्रमाणपत्र मागणी करण्यात येत आहे. जे परीक्षार्थी सन 2021 2022 या आर्थिक वर्षातील नॉन क्रेमिलेअर (एन.सी.एल.) प्रमाणपत्र सादर करीत आहेत त्यांना मुलाखतीतून अपात्र करण्यात आलेले आहे असे निदर्शनास येत आहे. तरी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिध्द करणेत आलेल्या जाहिरातीमध्ये नॉन-क्रेमिलेअर (एन.सी.एल.) प्रमाणपत्र कोणत्या आर्थिक वर्षातील असावे याचा कोणताही स्पष्ट उल्लेख नसल्याने व कोरोना कालखंडामुळे सदरचे प्रमाणपत्र न मिळाल्याने संदर्भित पोलिस उपनिरीक्षक पदासाठीच्या मुलाखतीसाठी सन 2021 या आर्थिक वर्षातील नॉन-क्रेमिलेअर (एन.सी.एल.) प्रमाणपत्र ग्राह्य धरून महाराष्ट्रातील तमाम परीक्षार्थीना न्याय देण्यात यावा अशी मागणी हजारो युवकाच्या वतीने आमदार संदीप क्षीरसागर यांनी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती आज केलेल्या पाठवल्या शिवाय असून यश आले हजारो युवकांनी आमदार संदीप क्षीरसागर यांचे प्रत्यक्ष भेटून आणि फोन करून आभार मानले आहेत.










