माणसाच्या जिवापेक्षा कर्मचार्यांना पेन्शनचं आंदोलन महत्वाचं वाटलं; जिल्हा रुग्णालयातील गंभीर प्रकार, जिल्हाधिकार्यांनी तात्काळ यंत्रणा हलवली; अप्पर जिल्ह्याधिकार्यांसह उपजिल्हाधिकार्यांना रुग्णालयात पाठवलं.
डॉ.साबळे यांनी खाजगी डॉक्टरांना बोलावून अपघातग्रस्तांवर उपचार केले
बीड (रिपोर्टर)ः- ऊसतोडणीहून गावाकडे निघालेल्या ऊसतोड मजुरांच्या ट्रकला तेलगांव रोडवर आज सकाळी अपघात झाला. अपघातात जवळपास 40 मजूर जखमी झाले. या मजुरांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र कर्मचार्यांचा संप असल्यामुळे रुग्णांची हेळसांड झाली. रुग्ण जिल्हा रुग्णालयात येत असतांना रुग्णालयाच्या दारासमोरच सर्व कर्मचारी घोषणा देत आंदोलन करत होते. या कर्मचार्यांना थोडीही जाणीव झाली नाही. आधी आपण गंभीर रुग्णंावर उपचार करावा आणि नंतर आंदोलनात सहभागी व्हावे. सदरील प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी मुंडे यांना झाल्यानंतर त्यांनी तात्काळ यंत्रणा हलवली. याबाबत डॉ.साबळे यांना उपचार करण्याचे सांगितले. रुग्णालयात अप्पर जिल्हाधिकार्यांसह उपजिल्हाधिकार्यांना पाठवले. डॉ.साबळे यांनी खाजगी डॉक्टरांना बोलावून जखमी रुग्णांवर उपचार करुन घेतले.
सोलापूर जिल्ह्यातील बसवेश्वर कारखान्याचा पट्टा पडल्याने मजुर आपल्या गावी परतत होते. सकाळी 8 वाजता उभ्या असलेल्या ट्रकला (क्र.एम.एच 23.5832) मजुराचा ट्रक (एम.एच.09. बी.ए.5551) तेलगांव रोडवर धडकला. या अपघातात जवळपास 40 मजुर जखमी झाले. यातील काहीची प्रकृती गंभीर आहे. या मजुरांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात कर्मचार्यांचा संप असल्यामुळे कोणीही उपस्थित नव्हतं. ज्यावेळी रुग्ण रुग्णवाहीकेतून रुग्णालयात दाखल होत होते त्याच वेळी कर्मचार्यांचे रुग्णालयासमोर आंदोलन सुरू होते. घोषणा बाजी होत होती. एकाही कर्मचार्यांना गंभीर रुग्णांची किव आली नाही. आधि उपचार करुन नंतर उपचार करावं असं वाटलं नाही हा प्रकार कोणालाच आवडलं नाही. सदरील घटनेची माहिती जिल्हाधिकारी मुंडे यांना झाल्यानंतर त्यांनी तात्काळ यंत्रणा हलवली. रुग्णालयात अप्पर जिल्हाधिकार्यांसह उप जिल्हाधिकार्यांना पाठवले. डॉ. साबळे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. साबळे यांनी उपचारासाठी बाहेरच्या डॉक्टरांना तात्काळ बोलावून घेत रुग्णांवर उपचार केले. अपघातामध्ये अंकुश राठोड, अमोल राठोड, शालन चव्हाण, गजाजन पवार, शिला चव्हाण, लक्ष्मी चव्हाण, पंढरी भुरके, शरद चव्हाण, निवृत्ती नवले, कवीता राठोड, वर्षा राठोड, सुशिला नवले, सिताराम लोहकरे, तुळसाबाई लोहकरे, शिवाजी चव्हाण, संतोष राठोड यासह अन्य जण जखमी झाले. हे मजुर परभणी जिल्ह्यातील असोला आणि जालना जिल्ह्यातील तिर्थापुरी येथील आहे.