Friday, October 22, 2021
No menu items!
Homeकोरोनापहाटे धारूरच्या घाटात मैदा व हळदीच्या पोत्यांची चोरी तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पहाटे धारूरच्या घाटात मैदा व हळदीच्या पोत्यांची चोरी तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

किल्ले धारूर ( रिपोर्टर )- धारूर घाटातून हळदी आणि मैद्याचे पोते घेऊन जाणार्‍या ट्रकची वळणावर गती कमी झाल्यानंतर चोरटयांनी आतील पोते चोरले. या प्रकरणी तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


धारूर येथील घाटाच्या पायथ्याशी रस्त्याचे काम सुरू आहे त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी वळण रस्ता केलेला आहे या वळण रस्त्यावरून पहाडी पारगाव येथील ट्रक (एम एच २१ एक्स ५३९९) ही चाकण येथून लातूर कडे मैद्याची पोते घेऊन जात होते. मध्यरात्री ट्रक त्या वळणावर आले असता ट्रकमधील ताडपत्री फाडून त्यातील मैद्याची पोते बाहेर टाकले तसेच पुढे डांबरी रस्ता सुरू झाल्याने आणखी एक पोते बाहेर टाकले त्यावेळी धप्पकन आवाज आला चालकाच्या लक्षात आले कुणीतरी आपल्या गाडीतील मैद्याची पोते काढत आहे परंतु भीतीपोटी तो ट्रक वेगाने पळवत चालक घाटाच्या वरती आला. त्यावेळी गस्ती वरती असलेली पोलीस उपनिरीक्षक गोविंद बास्टे, सय्यद खलील, चालक गोरख खाडे, होमगार्ड मैंद हे पोलिस वाहनाने गस्त घालण्यासाठी जात होते त्यावेळी चालकांनी सांगितले माझ्या गाडीतील पोते चोरी गेले आहेत आणि चोर घाटातच आहेत पोलिस आरोपींच्या शोधासाठी चोरी झालेल्या ठिकाणी वळणावरती गेले असता तेथे काही मैद्याची पोते व काही हळदीचे पोते दिसून आले थोडे पुढे जाऊन तपास केला असता झुडपांमध्ये हळदीचे व मैद्याचे पोते दिसून आले. यावरून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले चोरीच्या गुन्हे वरून तीन तरुणांना ताब्यात घेण्यात आली आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!