आंदोलनकर्त्यांनी शहरवासीयांना वेठीस धरले
जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्मचार्यांचा भव्य मोर्चा; दिड ते दोन तास वाहतूक ठप्प,
कर्मचार्यांनी शासनाच्या विरोधात दिल्या घोषणा; कर्मचार्यांना टरबुज दाखवून कोणाला हिनवायचे?
बीड (रिपोर्टर)ः- अतिरिक्त पैश्यासाठी लालचलेल्या कर्मचार्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी सरकारसह अवघ्या महाराष्ट्राला वेठीस धरुन ठेवेलेले असतांनाच कर्मचार्यांनी आज बीड शहरवासीयांना मोर्चा काढून वेठीस धरले. सिध्दीविनायक पासून कर्मचार्यांनी मोर्चा काढला. आपली संख्या अधिक दिसावी अथवा रस्त्यावर ट्रॉफीक जाम व्हावी या उद्देशाने दोन लोकांची लाईन करत मोर्चा काढला. यावेळी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. मात्र मोर्चा करण्याच्या या लांब लाईनमुळे अक्षरशं शहरातील ट्राफीक दोन ते तिन तास जाम झाली. अनेकांना आपल्या ठिकाणी वेळेत पोहचायचे होते. मात्र कर्मचार्यांच्या या अडेलटटू मोर्चामुळे लोकांना त्रास झाला. हा मोर्चा काढण्यापेक्षा कर्मचार्यांचा संप सुरू आहे. ते लोकांना त्रास होणार नाही असे आंदोलन करु शकले असते. मात्र सर्वसामान्यांना कर्मचार्यांचा आंदोलनाचा त्रास होत असल्याने या आंदोलनाबाबत सर्वसामान्य जनतेतून तिव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे तर दुसरीकडे पोलीस प्रशासनानेही ट्राफीक सुरळीत व्हावी, लोकांना त्रास होणार नाही अशी कुठलीही व्यवस्था केलेली नव्हती. सदरील मोर्चा हा कलेक्टर कचेरीवर जावून धडकला.
शासकीय कर्मचार्यांना लठ्ठ पगार असतांना कर्मचारी जुन्या पेन्शनवर आडून बसले. जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून 14 मार्च पासून बेमुदत संप पुकारण्यात आला. या संपामुळे सर्वच शासकीय कार्यालय ओस पडले असून कामकाज पुर्णतः ठप्प झाले. कार्यालय बंद असल्याने नागरीकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आज कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला. मोर्चामध्ये जवळपास सर्वच कर्मचारी सहभागी झाले होते. सिध्दीविनायक
कॉम्पलेक्स पासून मोर्चाला सुुरूवात झाली होती. मोर्चामुळे सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे चौक, नगर रोड याठिकाणी वाहतूक जाम झाली होती. काही नागरीकांना वेगवेगळी कामे होती. वेळेत पोहचणे गरजेचे होते. अशांची मात्र वाहतूक कोंडीमुळे चांगलीच परेशानी निघाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यावर आंदोलन कर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा बाजी केली. काही कर्मचार्यांनी हातात टरबूज दाखवून शासनाचा निषेध केला. टरबूज दाखवण्याचा उद्देश मात्र काय होता? कर्मचार्यांच्या या आंदोलनामुळे बीडकरांना वेठीस धरले गेले.
निवासी जिल्हाधिकार्यांनी महसुलच्या कर्मचार्यांना नोटीसा बजावल्या
कर्मचार्यांच्या आंदोलनामुळे महसुल विभाग पुर्णपणे ठप्प झाले. महसुल विभागाअंतर्गत अनेक कामे असतात. त्यामध्ये शेतकर्यांचीही कामे मोठ्या प्रमाणात असतात. निवासी उपजिल्हाधिकारी राऊत यांनी महसुलच्या 852 कर्मचार्यांना नोटीसा बजावल्या आहे. तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येवू नये असा उल्लेख नोटीसीमध्ये आहे.
संघटनेचा नेता
मिडियावर घसरला
जुन्या पेन्शन योजनेसाठी संपावर असलेल्या कर्मचार्यांनी आज जो मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये भाषण करताना एका संघटनेचा पदाधिकारी मिडियावाल्यांनी आम्हाला शिकवू नये आमच्या पगारातून किती रक्कम सरकार काढून घेतेय, ती किती वर्षे वापरते ते आम्हाला माहिती आहे. हे गणित आम्ही संपाच्या माध्यमातून सरकारला सांगतोय मात्र जनमाणसात या कर्मचार्याविरोधात जी भावना मिडियाने मांडली त्या भावनेच्या विरोधात आज मोर्चेकर्यांसमोर भाषण करताना संघटनेच्या पदाधिकार्यांनी मिडियावर टिका केली.