बीड (रिपोर्टर)ः- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महिलंाना एस.टी.प्रवासात सुट देण्याचा निर्णय देण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी मध्यरात्रीपासून झाली. अनेक महिलांनी याचा लाभ घेत प्रवास केला. यापुर्वी वयोवृध्दांना प्रवासात सुट देण्यात आली होती. आता महिलांना प्रवासात सुट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
एस.टी महामंडळ अंतर्गत दररोज राज्यभरातील लाखो प्रवासी प्रवास करतात. ग्रामीण भागामध्ये रात्रंदिवस एस.टी. धावत असते. महामंडळ तोट्यात असतांनाही नागरी सुविधा देत आहे. वयोवृध्दांना प्रवासात सुट देण्याचा निर्णय यापुर्वी घेण्यात आलेला आहे. नुकताच अर्थ संकल्प विधी मंडळात सादर करण्यात आला. या अर्थ संकल्पामध्ये एस.टी. महामंडळाअंतर्गत महिलांना प्रवासामध्ये सुट दिली गेली. मध्यरात्री पासून त्याची अंमल बजावणी झाली. राज्य भरात आता कोठेही महिलंाना फक्त आर्धेच टिकीत लागणार आहे. शिरुर सह आदि मार्गावर अनेक महिलंानी प्रवास केला आहे. शासनाच्या या निर्णयाचा महिलांकडून स्वागत करण्यात येत आहे.