बीड (रिपोर्टर) प्रस्थापित माजी मंत्री जर माझी आमदार म्हणून शहराच्या विकासासाठी निधी आणत असतील तर त्यांनी माजी म्हणूनच जिल्ह्यासह संपूर्ण देशाचा विकास करावा, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. बाकी बीड मतदार संघाचे पुढील 20 वर्ष मी पाहतो असे वक्तव्य आ.संदीप क्षीरसागर यांनी घोडका राजुरी येथे नाबार्ड अंतर्गत प्ररामा 16 ते वांगी रस्ता ग्रामा 51 कि मी 0/200 मध्ये एक कोटी 26 लाख रुपयाच्या लहान पुलाच्या भूमिपूजन प्रसंगी प्रसंगी केले. याप्रसंगी माजी आ.सय्यद सलीम, इंजि.तोंडे, इंजि. बोराडे, वाघमारे ताई यांच्या शुभहस्ते तर घोडका राजुरी येथील सरपंच, माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य माता-भगिनी आदींचे उपस्थितीत संपन्न झाले.
याप्रसंगी बोलताना आ.संदीप क्षीरसागर म्हणाले की, घोडका राजुरीने विधानसभा निवडणुकीत मला खूप मोठे सहकार्य केले असून प्रस्थापितांचे भीतीमुळे माझ्या मागे एक पण कार्यकर्ता नव्हता पण मनातून त्यांनी मला मतदान रुपी आशीर्वाद दिले आणि प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवून दिली. गेल्या पंचवीस वर्षापासून घोडका राजुरी येथील काठवडा नदीवरील पुलाचा प्रश्न प्रस्थापितांनी पूर्ण केला नाही. या पुलाव अभावी अनेक ग्रामस्थांना आपले जीव गमावावे लागले आहेत. प्रस्थापितांचे हेच राजकारण त्यांना भावले असून आज घोडका राजुरी येथील या पुलाचा प्रश्न माझ्या हातून मार्गे लागत आहे हे माझे मोठे भाग्य आहे. येणार्या काळात परळी हायवे ते घोडका राजुरी हनुमान मंदिर हा मुख्य रस्ता तर दलित बांधवांसाठी समाज मंदिर करण्याचा माझा मानस आहे. कोविडच्या काळामध्ये दोन वर्ष माझ्या आमदार फंडाचा एक रुपया सुद्धा मला मिळाला नाही कारण तो पैसा कोविड करता वापरला गेला. पण मागील एक दीड वर्षापासून बीड मतदार संघात विशेषत बीड शहरात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून भूतो ना भविष्य ते असे सिमेंट रस्ते मी उभे केले आहेत. याकरता हायकोर्ट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचे हे फलित आहे म्हणूनच बीड मतदार संघाचे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे चालू आहेत. पण प्रस्थापित माजी मंत्री आणि माजी आमदार स्वतःची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त असून कुठलाही निधी आणला तरी मीच आणला असे प्रसिद्धी पत्रिका छापून आणित आहेत. जर असे होत असेल तर तुम्ही माजी आमदारच राहून जिल्ह्याचा आणि देशाचा विकास करा माझे मतदारसंघाचे पुढील 20 वर्ष मी पाहतो.यावेळी बीड शहरातील मोमिन पुरा भागात पूर्ण झालेल्या शादीखाना, सिमेंट रस्ता नाली बांधकाम आणि पुलाच्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी मोमीनपुरा भागातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.