बीड (रिपोर्टर)ः- शेतकर्यांवर नेहमीच कोणते ना कोणते नैसर्गीक संकट कोसळत असते. अतिरिक्त पावसाने खरीप हंगामात मोठं नुकसान झालं होतं. त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही. तोच दोन दिवसापासून मराठवाड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घताला. या पावसामुळे हाता तोंडाला आलेला घास निसर्ग हिरावून घेत आहे. काढणीला आलेला गहू, ज्वारी या पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी फळबागा कोलमडून पडल्या. भाजीपाल्याचाही नुकसान झालं आहे. या अवकाळीमुळे शेतकरी हाताश झाला. त्याचे मोठे आर्थीक नुकसान झाले.
रब्बी हंगाम यंदाचा चांगला आहे. पाऊस चांगला पडल्याने शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात विविध पिकांची लागवड केली. गेल्या तिन दिवसापासून अवकाळी पावसाचा तडाका सुरू आहे. वादळी वार्यांवर पाऊस व गारपीट झाल्याने काढणीला आलेली ज्वारी काही ठिकाणी भुईसपाट झाली. गहू हरभर्यांचे नुकसान झाले. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली याठिकाणी अंबा, मोसंबी, चिकू, लिंबु, इत्यादी फळ पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. अवकाळीचा फटका फळ पिकांना बसला. काही ठिकाणी झाडे कोलमडून पडली. भाजी पाल्याचेही नुकसान झाले. खरीप हंगामात अतिरिक्त पावसाने कापूस, सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले होते. त्याची अद्याप नुकसान भरपाई राज्य सरकारने दिली नाही. तोच रब्बी हंगामातील पिकांना अवकाळीचा तडाका बसला आहे. यामुळे शेतकरी चांगलाच हताश झाला. नुकसान ग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.