Friday, October 22, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षण प्रकरणी पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची शिफारस

मराठा आरक्षण प्रकरणी पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची शिफारस


मुंबई (रिपोर्टर):- मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालास पुनर्विलोकन याचिकेद्वारे आव्हान देण्याची शिफारस भोसले समितीने राज्य शासनाला केली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. मराठा आरक्षणाबाबत कोर्टाच्या निकालाचा सखोल अभ्यास व पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारशी करण्यासाठी राज्य सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली विधिज्ञांची समिती नेमली. या समितीने शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अहवाल सादर केला.

Most Popular

error: Content is protected !!