मराठवाडयाचा दुष्काळ संपावयाचा असेल तर बाहेरुन पाणी आणा
पश्चिम वाहिन्याचे काम तात्काळ सुरू करावे-आ. प्रकाश सोळंके
मुंबई (रिपोर्टर)ः-
महाराष्ट्रामध्ये मराठवड्यामध्ये शेतकर्यांच्या सर्वाधीक आत्महत्या होतात. यामध्ये अधिकच्या आत्महत्या या बीड जिल्ह्यामध्ये होतांना दिसून येतात. शेतकर्यांचे आत्महत्या रोखायचा असतील तर या भागातील पाणी प्रश्न मिटवणे अत्यंत महत्वाचे आहे. गोदावरी खोरे हे चुकीचे खोरे आहे. बीड जिल्ह्यातून बाहेरुन पाणी आणल्याशिवाय या भागातील तान भागणार नाही. दुष्काळाची भेडसवणारी चिंता दुर होणार नाही. मराठवाडयाचा अमृत महोत्सव सुरू आहे. त्यानिमित्ताने सातत्याने घोषणा केलेले पश्चिम वाहिनीचे खोरे त्याचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी आमदार प्रकाश सोळंके यांनी केली.