बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन
बीड
बीड जिल्ह्यात अवेकाळीने शेतकर्रांच्रा शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जनावरेही दगावली, अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. अतोनात नुकसान असतां शेतकर्यांना वार्यावर सोडणार्या संवेदनाहीन पालकमंत्री अतुल सावे यांना हटवा या मागणीसाठी बीडमध्ये सोमवारी सामाजिक कार्रकर्ते डॉ.गणेश ढवळे रांच्रा नेतृत्वाखाली लक्ष्रवेधी निष्क्रिर पालकमंत्री हटाव आंदोलन करण्रात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गारपीट व अवकाळी पावसाने शेतीमाल, फळपिके, भाजीपाला नुकसान रांना तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. बीड जिल्ह्यात 15 दिवसात दुसर्रांदा वादळीवार्रासह गारपीट झाली असुन शेतकर्रांच्रा काढणीस आलेल्रा शेतीपिकांचे जास्त नुकसान झाले आहे. 2762 हेक्टर वरील पिकांना फटका बसला असून कांदा, गहू, ज्वारी,बाजरी आदि रब्बी पिकांसह आंबा,चिकु, टरबुज,खरबुज, डाळिंब,लिंबु ,द्राक्षे फळबागांचे व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्रासाठी तातडीने पंचनामे करून मदतीची घोषणा सरकारने करावी.गारपीठग्रस्तांना आपत्ती निवारण कारद्यानुसार शासनाने जिल्रातील शेतकर्रांना एकरी लाख रूपरे मदत द्यावी. अशी मागणी करण्यात आली. यावेळी शेख रुनुस च-हाटकर , रामनाथ खोड,मुबीन शेख, बलभीम उबाळे, मिलिंद सरपते,प्रा.पंडीत तुपे , भिमराव कुटे आदि.सहभागी झाले होते.