Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडहिरापूरच्या पशूवैद्यकीय डॉक्टरची लाचखोरी वाढली शेतकर्‍याची जाणीवपुर्वक अडवणूक

हिरापूरच्या पशूवैद्यकीय डॉक्टरची लाचखोरी वाढली शेतकर्‍याची जाणीवपुर्वक अडवणूक

पैसे उकळण्यासाठी दवाखान्यात उपचार करण्याऐवजी गावात फिरतोय डॉक्टर

बीड (रिपोर्टर):- हिरापूर येथे पशूवैद्यकीय दवाखाना आहे. तेथे महेश लकडे नावाचे डॉक्टर कार्यरत आहेत. परिसरातील शेकडो शेतकरी बैल चेमटण्यासाठी व जनावरांवरील विविध उपचारासाठी दवाखान्यात येतात. मात्र येथील डॉक्टर दवाखान्यात जनावरांवर उपचार न करता तुमच्या गावाकडे मी येतो, असे म्हणून गावात जावून शेतकर्‍यांकडून पाचशे ते हजार रुपये उकळतात. तर वेळेवर ते गावातही येत नाही आणि दवाखान्यातही उपलब्ध नसल्याने अनेक शेतकर्‍यांना आल्या पावली परत जावे लागते.

हिरापूर येथे जनावरांचा बाजार भरतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तेथे जनावरे येतात. त्याच ठिकाणी शेतकरी जनावरांना घेऊन पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी येतात. तेथील डॉक्टर महेश लकडे हे पैसे खाण्यासाठी दवाखान्यात न थांबता गावात जातात. त्यामुळे तेथे आलेल्या शेकडो शेतकर्‍यांना आपल्या जनावरांवर उपचार न करताच परत जावे लागते. असा आरोप शेतकर्‍यांमधून केला जात आहे तर त्या ठिकाणी उपचारासाठी शेतकरी जनावरे घेऊन आले तर चार-पाच अजून लोकं घेऊन या असा सल्ला येथील डॉक्टर देतात. त्यामुळे चार-पाच लोकं अजून कुठून आणायचे, असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे. केवळ पैसे उकळण्यासाठी डॉक्टरांचा हा खटाटोप सुरू असल्याचा आरोप शेतकर्‍यांमधून केला जात आहे.

Most Popular

error: Content is protected !!